25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriसावरकर नाट्यगृहातील अनेक गैरसोयींबाबत कलाकार आणि नाट्यप्रेमींमध्ये नाराजगी

सावरकर नाट्यगृहातील अनेक गैरसोयींबाबत कलाकार आणि नाट्यप्रेमींमध्ये नाराजगी

सावरकर नाट्यगृहातील अनेक गैरसोयीनी सध्या रंगमंचावरील कलाकारांना अक्षरशः घामाघूम व्हावे लागत असल्याने नाराजगी वाढली आहे.

रत्नागिरीमध्ये कोरोना काळानंतर पुन्हा नाटकांचे प्रयोग सुरु झाले आहेत. परंतु, एवढ्या भव्य दिव्य बांधण्यात आलेल्या इमारतीला एसी देखील बसविण्यात आलेत परंतु ते कमी क्षमतेचे असल्याने त्याचा उपयोग शून्य आहे. वि. दा. सावरकर नाट्यगृहातील अनेक गैरसोयीनी सध्या रंगमंचावरील कलाकारांना अक्षरशः घामाघूम व्हावे लागत असल्याने नाराजगी वाढली आहे.

सध्या सूर्याचा सुरु असलेला प्रकोप लक्षात घेऊन, दिवसभर एवढा गरमा सहन करावा लागत आहे, कि घरातून बाहेर देखील पडू नये अशी अवस्था आहे. मारुती मंदिर परिसरातील नाट्यगृहामध्ये प्रचंड प्रमाणात उष्मा जाणवत आहे. जास्त क्षमतेच्या वातानुकुलीत यंत्रणेविना पर्यायच नाही आहे. मात्र बसविलेली वातानुकुलीत यंत्रणा कालबाह्य आणि कमी क्षमतेची आहे.

नाट्यगृहाची करण्यात आलेली रचना सुद्धा वाद्ग्रस्त आहे. ध्वनीयंत्रणा देखील व्यवस्थित कार्य करत नसल्याने, अशा विविध समस्यांनी भेडसावत असल्याने नाट्यप्रेमींची आणि कलाकारांमध्ये प्रचंड नाराजगी पसरली आहे. यामुळे या नाट्यगृहासाठी कोट्यवधीचा ओतलेला पैसा फुकट गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केल्याने पालिका प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

सावरकर नाट्यगृह हे पालिकेच्या मालकीमध्ये येते. नाट्यगृहाच्या रंगमंचावर कलाकार अक्षरशः घाम गाळून अभिनय करावा लागत आहे. मध्यंतरी पार पडलेल्या सावंतवाडीतील क्षितिज इव्हेंट्स या संस्थेचे मत्स्यगंधा हे नाटक सुरू होते, तीन अंकांच्या नाटकात पहिले दोन अंक सुरळीत पार पडले. पण तिसरा अंक सुरू होण्या अगोदरच भीष्माच्या प्रमुख भूमिकेत असणारे कलावंत बाळ पुराणिक यांना रंगमंचावरच अस्वस्थ वाटू लागले.

दुसऱ्या प्रवेशात अखेरच्या भागातच त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करावे लागले. पुरेशा सुविधा नसल्याने हा त्रास वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. नाट्यगृहाच्या उभारणीसाठी झाला नसेल,  तेवढा त्याच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत खर्च झाला आहे. पण तरीही गैरसुविधेमध्ये सुद्धा कलाकार काम करत आहेत आणि नाट्यप्रेमीं नाईलाजाने घामाघूम होत नाटकाचा आस्वाद घेत आहेत,  अशी गंभीर परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular