28.2 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

वार्ता विघ्नाचीच! गणेशोत्सवासाठी आलेल्या तरूणाचा विहिरीत बुडून मृत्यू

ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत रत्नागिरी जिल्हयात दुर्घटना ओढावत...

प्रेयसीचा खून करून मृतदेह आंबा घाटात फेकून दिला

रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे गावातील तरुणीचा आंबा घाटात...

इंग्रजापेक्षाही क्रूर वागणूक देणाऱ्याऱ्यांना मराठ्यांची चपराक!

मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे...
HomeRatnagiriबँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत भामट्याने तरूणींना घातला लाखोंचा गंडा

बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत भामट्याने तरूणींना घातला लाखोंचा गंडा

दोन महिने उलटून गेले तरी बँकांचे नियुक्तीपत्र हाती आले नाही.

बँकेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवत रत्नागिरीतील एका भामट्याने अनेक तरूणींना लाखो रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. प्रकरण पोलिस स्थानकात जाईल, या भीतीने या भामट्याने काही तरूणींचे अर्धे पैसे परत केल्याची चर्चादेखील सुरू झाली आहे. आजवर ऑनलाईन गंडा घालणारे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत, मात्र परप्रांतीयांना मागे टाकत रत्नागिरीतील एका तरूणाने ‘महाप्रताप’ केले आहेत. आपल्या ओळखीतील तरूणींना नामांकित बँकेत नोकरी लावतो, असे सांगून लाखो रूपये उकळल्याचा प्रकार पुढे आला आहे. काहींकडून २५ हजार तर काहींकडून ५० हजार रक्कम त्या भामट्याने उकळली आहे. जो शब्द दिला होता, त्याची तारीख टळून गेली तरी देखील बँकेचं नियुक्तीपत्र (हजर होण्याचे पत्र) या तरूणींना मिळाले नाही. वारंवार त्या भामट्याकडे तरूणींच्या कुटुंबियांनी संपर्क केला असता १५ दिवसांत तुमचे नियुक्तीपत्र हातात मिळेल, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न त्याने केला.

दोन महिने उलटून गेले तरी बँकांचे नियुक्तीपत्र हाती आले नाही. त्यातच त्या भामट्याने कुटुंबियांचा फोन उचलणे बंद केल्याने आपली फसवणूक झाली आहे, हे साऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. अनेकांनी त्या भामट्याचे घर गाठले. मात्र ‘पाळंद’ एरियात राहणाऱ्या त्याच्या कुटुंबियांनी आधीच हात वर केले. त्याचा आणि आमचा संबंध यापूर्वीच संपला आहे. आम्ही यापूर्वी वर्तमानपत्रातदेखील तसे जाहीर केले होते, अशी भूमिका त्याच्या कुटुंबियांनी घेतल्याची चर्चा सुरू आहे. मात्र एवढे होऊन देखील हा भामटा तरूण आपले कारनामे करण्याचे बंद केले नाही. या भामट्याने नामांकित बँकांची नावं घेऊन अनेकांना आमिष दाखवले होते. त्याच्या आमिषाला भूलून लाखो रूपये त्याला नोकरी लागेल या उद्देशाने देण्यात आले.

मात्र कालांतराने हा भामटा असल्याचे पुढे आल्यानंतर पैसे देणाऱ्या सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले. हा प्रकार आता पोलीस स्थानकात जाणार याची चुणूक लागल्यानंतर त्या भामट्याने काही लोकांचे अर्धे पैसे परत केले. तर अजूनही तो अनेकांचे लाखो रूपये देणे आहे. कधी बँकेचा प्रॉब्लेम आहे, तर कधी इन्कम टॅक्सने प्रॉब्लेम केला आहे, असा बहाणा करून हा भामटा नेहमीच वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या सततच्या आश्वासनांना कंटाळून फसवणूक झालेल्या कुटुंबियांनी त्याला अखेरची डेडलाईन दिली असून या मुदतीत पैसे न मिळाल्यास पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट संकेत या भामट्याला दिले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular