31.4 C
Ratnagiri
Monday, March 17, 2025

दोन्ही समाजातील प्रतिनिधींची घेतली बैठक – आ. किरण सामंत

राजापूर शहरासह राजापूर तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या...

संगमेश्वरचे ग्रामीण रूग्णालयात अनेक पदे रिक्त…

मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर कसबा नजिक ग्रामीण रूग्णालय...

काँग्रेसची जिल्ह्यात अस्तित्वासाठी धडपड…

जिल्ह्यावर १९७२ पासून अगदी १९९० पर्यंत काँग्रेस...
HomeRatnagiriसंगमेश्वरच्या देवळे गावात रात्रीच्या भयाण किंकाळ्या!

संगमेश्वरच्या देवळे गावात रात्रीच्या भयाण किंकाळ्या!

यंत्रामधुन भुतासारखा किंकाळ्यांचा आवाज येत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.

संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावात आजकाल भुताच्या किंकाळ्यांची पारापारावर चर्चा रंगली आहे. एका वाडीच्या आजूबाजुला मोठ मोठ्या किंखाळ्याचा आवाज येत असल्याचे दावे बुजुर्ग मंडळीच करत असल्याने परिस्थितीचे गांभिर्य वाढले. सुरुवातीला काही दिवस फाकपंचमी असल्याने तो आवाज मुलांचा असावा म्हणून दुर्लक्ष केले गेले. मात्र होळीनंतरही आवाज येतच राहील्याने हा काहीतरी वेगळाच प्रकार असल्याचे अंदाज बांधले गेले. ग्रामस्थ भयभीत झाले. चार दिवसापुर्वी सायंकाळी ७.३० वाजता माळवाडीतील काळकाई माळाच्या दिशेने अचानक भुताच्या किंकाळ्यासारखा आवाज ऐकू येवू लागल्याने होळीसाठी जमलेली लहान मुले घाबरून आपापल्या घरी पळून गेली. चित्रपटातील हॉरर शो बघुन तरुणाईच्या डोक्यात भिनलेला भुतांच्या आवाज प्रत्यक्षात ऐकू येऊ लागल्याने त्यांचीही घाबरगुंडी उडाली.

किंखाळ्यांचा आवाज इतका मोठा आणि भयानक होता की चाफवली मधलीवाडीपर्यंत हा आवाज अगदी सहज पोहोचत होता. कोणी म्हणू लागले शिमगा जवळ आला की भुते होळी खेळतात, तर म्हातारी माणसं सांगू लागली की कोणाची तरी राखण द्यायची राहिली असेल म्हणून भूत रडत असेल. पूर्वी आम्ही असे आवाज खूप ऐकत होतो. पण गावात वीज आली आणि भुते गायब झाली. हळूहळू किंचाळण्याचे आवाज गावच्या दिशेने यायला लागले. तसे लोक अधिकच घाबरले. पण काही वेळाने आवाज परत दुर गेले. बिबट्याने जंगली प्राणी पकडला असावा त्यामुळे तो प्राणी ओरडत असेल असे त्याला वाटले पण हा आवाज दोन तासांपासून येत राहिल्याने गूढ अधिकच वाढले. असं घाबरत किती दिवस काढायचे, अशा विचाराने काही तरुणांनी या सगळ्याचा शोध घ्यायचे ठरवले. आवाज नेमका कोणत्या दिशेने येतोय त्याचा अंदाज घेतला आणि सत्य पडताळण्याचे ठरवले. त्या किंकाळ्यांचा कानोसा घेत पाठलाग केला.

माळवाडीमध्ये सावंत यांनी आपल्या बागेत वन्यप्राणी प्रतिबंधक यंत्र बसवले असावे आणि त्याच यंत्रामधुन भुतासारखा किंकाळ्यांचा आवाज येत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर संदेश गुरव यांनी बागेजवळ जाऊन बागेतूनच आवाज येत असल्याची खात्री केली. सध्या कोकणात हापूस आंबा आणि काजूच्या हंगाम सुरू झाला असून बागायतदारांना रात्रीच्या वेळी गवारेड्यांचा प्रचंड त्रास होत आहे. हे गवे रात्रीच्या वेळी बागेत शिरून झाडे मोडून बागाच्या बागा उद्ध्वस्त करून टाकत आहेत. म्हणूनच बागेच्या रक्षणासाठी हल्ली सगळेच शेतकरी अशी यंत्र बसवत आहेत, पण ती बसवताना माणसाचा, बिबट्याचा, कुत्र्याचा, असे आवाज सुरू ठेवावेत, म्हणजे कोणी घाबरून जाणार नाही. गेला आठवडाभर रोज रात्री त्या यंत्रामधून हा किंकाळ्यांचा आवाज येत असून ज्यांना अजूनही सत्य माहीत नाही ते भुताचीच चर्चा करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular