25.8 C
Ratnagiri
Saturday, September 14, 2024

‘तुंबाड’च्या रि-रिलीजने केले मालामाल, आता चित्रपटाचा सिक्वेल होणार का?

अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी स्टारर 'लैला-मजनू'...

हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही मासे कमीच

पावसाळी दोन महिन्यांच्या बंदीनंतर मासेमारी सुरू झाली...

शेतकरी, मच्छीमार, पर्यटन उद्योजकांच्या आंदोलनाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद

जाकादेवी रत्नागिरी येथील शेतकरी आंदोलन स्वराज्य भूमी...
HomeChiplunमहिलांना आरक्षणाची भाजपची योजना फसवी - आदित्य ठाकरे

महिलांना आरक्षणाची भाजपची योजना फसवी – आदित्य ठाकरे

विनायक राऊत हे अभ्यासू आणि सुसंस्कृत उमेदवार आहेत.

ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली; मात्र भाजप आणि शिंदे सरकारची मदत अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. महिलांना आरक्षण देण्याची भाजपची फसवी योजना आहे. २०३२ पर्यंत भाजप महिलांना आरक्षण देणार नाही; मात्र आमची सत्ता आल्यानंतर आम्ही तत्काळ महिलांना ५० टक्के आरक्षण देऊ, अशी ग्वाही शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी चिपळुणात आदित्य ठाकरेंची सभा झाली.

सभेत त्यांनी भाजप, केंद्र आणि राज्य सरकार तसेच महायुतीचे उमेदवार नारायण राणेंवर टीका केली. ते म्हणाले, ‘रत्नागिरी- सिंधुदुर्गमधील मतदारांनी खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे कोकणची संस्कृती बिघडत असेल, तर त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. विनायक राऊत हे अभ्यासू आणि सुसंस्कृत उमेदवार आहेत. दहा वर्षे त्यांनी कोकणसाठी चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांची विजयाची हॅट्रिक होणार हे निश्चित आहे.”महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे आहे. देशात इंडिया आघाडी पुढे आहे.

भाजप जिंकणार नाही; मात्र चुकून जिंकली तर पहिले टार्गेट त्याचे संविधान आहे. भाजपला संविधान बदलायचे आहे. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात तसे सांगितले आहे. भाजपला लोकशाही संपवून टाकायची आहे. लोकांनी त्यांच्या घरात काय खायचे, कोणते कपडे घालायचे, कुणाची पूजा करायची हे भाजप ठरवणार नाही. ते आम्ही होऊ देणार नाही. ज्यावेळी भाजपला पराभवाची भीती वाटते तेव्हा हिंदू-मुस्लिम दंगे घडवले जातात. मोदी सरकारने पहिली गुजरातमधील कांदा निर्यात बंदी हटवली; मात्र महाराष्ट्रातील कांदा निर्यातीवर अजूनही बंदी आहे.

मुंबईतील आणि देशातील उद्योग गुजरातला चालले आहेत. त्यामुळे सगळे काही गुजरातसाठी चालले आहे, यात महाराष्ट्र कुठे आहे? या निमित्ताने भाजपचा महाराष्ट्र द्वेष देशासमोर आला आहे. काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यानंतर काश्मीर शांत झाल्याचा दावा मोदी सरकारकडून केला जात आहे. मग काश्मीरमध्ये भाजपने का उमेदवार दिले नाहीत ? जम्मूमधील भाजपचे दोन्ही उमेदवार पराभूत होणार आहेत. मणिपूर जळतोय. तेथे अजूनही अशांतता आहे; पण पंतप्रधान कधी मणिपूरला गेले नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा देतो म्हणाले. तेही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेले नाही. मोदी दिसतात तसे नाहीत, हे लक्षात आल्यामुळे लडाखमधील भाजपच्या खासदाराने राजीनामा दिला आणि तेथील जनतेची माफी मागितली.

RELATED ARTICLES

Most Popular