25.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeChiplunजिल्ह्यात घुसलेल्या बांगलादेशींचा शोध घेऊन वितरण मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

जिल्ह्यात घुसलेल्या बांगलादेशींचा शोध घेऊन वितरण मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

चिपळूण येथे बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. विशेष म्हणजे यापैकी काही जण कोणत्याही कागदपत्रांशिवाय, तर काही जण बनावट कागदपत्रांसह अनेक वर्ष जिल्ह्यात राहत असल्याचे धक्कादायक प्रकार उघड होत आहेत. यातील काही घुसखोरांना जामिन मिळाल्यामुळे जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्था यांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम तीव्र करून त्यांना मदत करणाऱ्यांवर देखील देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे संजय जोशी, भाजपा जिल्हा सरचटणीस विनोद भूरण यांनी हिंदु जनजागृती समितीतर्फ शुक्रवारी चिपळूण येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. चिपळूण येथे बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. याप्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे.

१२ नोव्हेंबर २०२४ रोजी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रत्नागिरी तालुक्यातील नाखरे- कालरकोंडवाडी येथील चिरेखाणीवर अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. ते वैध कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश करून चिरेखाणीवर काम करत होते. इतकेच नव्हे, एका बांगलादेशी घुसखोराला रत्नागिरीजवळील शिरगाव येथे जन्म दाखला देण्यात आला होता. नुकतेच रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे बांग्लादेशी नागरिक असलेली महिला मागील आठ वर्षापासून भारतात वास्तव्य करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच या महिलेने भारतात वास्तव्य करत असताना आधारकार्ड, पॅनकार्ड आदी कागदपत्रे तयार केले असून विवाह देखील केल्याचे निष्पन्न झाले. तसेच या महिलेच्या नावावर शहरात मालमत्ता खरेदी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे असे हिंदू जनजागृती समितीने म्हटंले आहे.

रत्नागिरी जिल्हा, राज्य आणि देश यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यात ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम’ राबवावी; या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुके, शहरे आणि गावे येथील संशयित ठिकाणी ‘सर्च ऑपरेशन’, ‘कोम्बींग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढावे; बनावट ओळखपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटची पाळेमुळे उखडून त्यावर कठोर कारवाई करावी; अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. भाजप जिल्हा सरचिटणीस विनोद भूरण, युवा सेना तालुकाध्यक्ष निहार कोवळे, गोरक्षक विक्रम जोशी, हिंदुत्वनिष्ठ अभिनव भुरण, हिंदू राष्ट्र समन्वय समिती संयोजक अमित ‘जोशी, गुहागर विधानसभा शिवसेना निरीक्षक अनुराग उत्तेकर, प्रशांत उतेकर, संदेश महाडिक, श्रीधर भुरण, अमेय चितळे आदी मान्यवर यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular