25.8 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeEntertainmentमी माझी जुनी गाडी मुद्दाम कधीच विकत नाही कारण... प्रवीण तरडे

मी माझी जुनी गाडी मुद्दाम कधीच विकत नाही कारण… प्रवीण तरडे

अलीकडेच प्रसिद्ध आलेले 'धर्मवीर' किंवा 'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमांतून तरडेंनी साकारलेली भूमिका त्याची एक वेगळीच छाप अभिनय क्षेत्रात उमटवली  आहे.

अभिनेता प्रवीण तरडे नाव सध्या या ना त्या कारणामुळे माध्यमांमध्ये चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील या अभिनेता-दिग्दर्शकाचा बोलबाला आहे. अलीकडेच प्रसिद्ध आलेले ‘धर्मवीर’ किंवा ‘सरसेनापती हंबीरराव’ या सिनेमांतून तरडेंनी साकारलेली भूमिका त्याची एक वेगळीच छाप अभिनय क्षेत्रात उमटवली आहे. या क्षेत्रात असेही काही कलाकार आहेत, ज्यांनी प्रचंड स्ट्रगल करत या इंडस्ट्रीमध्ये नाव निर्माण केलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे प्रवीण तरडे हे आहेत. त्यामुळे आता जे अभिनय क्षेत्रात टिकण्यासाठी प्रयत्न करत आहेत, ज्यांनी नुकतीच सुरुवात केली आहे त्यांच्याविषयी प्रचंड आपुलकी असल्याचे प्रवीण तरडे सांगतात.

प्रवीण यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. ते म्हणतात की, ‘स्ट्रगल करणाऱ्यांना मी कायमच मदत करतो. माझ्या स्ट्रगलिंगच्या काळात मला कुणी मदत केलेलं आवडायचं नाही किंवा मी ती घ्यायचो देखील नाही. करण स्वतःमध्ये एक प्रकारचा असणारा स्वाभिमान असतो. त्यामुळे कुणाचा स्वाभिमान दुखावला जाऊ नये म्हणून मी अनेकदा न विचारता परस्पर मदत करतो.

या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या गाडीसंदर्भातील एक किस्सा कथन केला आहे. त्याची जुनी गाडी ते मुद्दाम कधीच विकत नाही याविषयी बोलताना ते म्हणतात की,  मी खूप वर्ष पैसे साठवून पहिली दुचाकी घेतली होती. आता ती मी याच क्षेत्रात स्ट्रगल करणाऱ्या एका कलाकाराला दिली. दुसरी टू व्हीलर देखील चारचाकी गाडी घेतल्यानंतर अजून एका नवीन स्ट्रगलरला दिली. असं मी माझी जुनी गाडी मुद्दाम कधीच विकत नाही. कारण मला जे नशीब त्या गाडीने दिलं ते त्या कलाकाराला मिळावं अशी माझी प्रामाणिक इच्छा असते.

या नवोदित कलाकारांच्या संपर्कात प्रवीण तरडे कायम राहतात, असाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ‘आपण जे भोगलंय त्याबाबतची मदत नवीन पोराला व्हायला हवी  असं वाटत अशी प्रतिक्रिया प्रवीण तरडे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular