20.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRajapurराजापुरात मच्छीमार्केट असूनही रस्त्यावर मासेविक्री

राजापुरात मच्छीमार्केट असूनही रस्त्यावर मासेविक्री

या कारवाईमध्ये तीन मासे विक्रेत्यांकडून विक्रीसाठी ठेवलेले मासे जप्त केले.

नगर पालिकेचे सुसज्ज मच्छीमार्केट असूनही अनेक महिला शिवाजीपथ रस्त्याच्याकडेला बसून मासेविक्री करतात. त्याबाबत पालिकेने वारंवार ताकीद देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या मासे विक्रेत्यांविरोधात आज पालिकेने कारवाई केली. आरोग्य व स्वच्छता निरीक्षक अमित पोवार आणि सहकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईमध्ये तीन मासे विक्रेत्यांकडून विक्रीसाठी ठेवलेले मासे जप्त करण्यात आले आहेत. शहरातील मुन्शीनाका परिसरामध्ये नगर पालिकेने सुसज्ज आणि प्रशस्त असे मच्छीमार्केट उभारले आहे. या ठिकाणी मासे विक्री करण्यासाठी ओटे आणि अन्य आवश्यक त्या सोयीसुविधा आहेत. तरीही अनेक महिला मच्छीमार्केटमध्ये न बसता शिवाजीपथ रस्त्यावर बसून मासेविक्री करतात. या ठिकाणी मासे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडून दुचाकी, चारचाकी गाड्या रस्त्याशेजारीच उभ्या केल्या जातात. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. ज्या भागामध्ये या महिला मासे विक्रीसाठी बसतात त्या भागामध्ये रिक्षा स्टॅण्डसह मोठ्या चारचाकी गाड्या आणि टेम्पोही उभे केले जातात.

तसेच कोल्हापूर वा अन्य भागातून घाऊक माल घेवून आलेले ट्रकही येथेच उभे असतात. वाहनांच्या भाऊगर्दीमुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे याठिकाणी मासेविक्री करू नये अशी ताकीद वारंवार पालिकेने या विक्रेत्यांना दिली होती. मात्र तरीही याठिकाणी मासेविक्री होत असल्याने आज पालिकेने कारवाई केली. तीन महिलांचे मासे जप्त करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मच्छीमार्केटमध्ये बसून मासेविक्री करावी, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

कराचे उत्पन्न बुडते – मच्छीमार्केटमध्ये बसून मासेविक्री करणाऱ्यांकडून पालिका कर आकारते. त्याच्यातून क वर्गीय मर्यादीत उत्पन्न असलेल्या पालिकेला उत्पन्न मिळते. मात्र रस्त्यावर बसून मासे विक्री केल्याने हे उत्पन्न बुडते.

RELATED ARTICLES

Most Popular