शिवसेने व आघाडी सरकारला केंद्रीय तपास यंत्रणेकडून धक्यावर धक्के मिळत आहेत. एनएसीएल घोटाळयाप्रकरणी ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३६ लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यातील शिवसेनेला मिळालेला हा दुसरा धक्का आहे.
ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची ११.३६ कोटीची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. एनएसीएल घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. यात ठाण्यातील काही जमिनींचा समावेश आहे. गेल्या दोन आठवड्यात ईडीने केलेली ही दुसरी कारवाई आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे मेहुणे आणि आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे सेनेमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. ईडीने यापूर्वीही एनएसीएल प्रकरणात सरनाईक यांची चौकशी केली होती. मात्र, त्यानंतर पुढे कोणत्याच हालचाली झाल्या नव्हत्या. आज अचानक ईडीने सरनाईक यांची संपत्ती जप्त केल्याने या कारवाईने ठाण्यातही खळबळ माजली आहे.
ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ११.३६ कोटी रुपयांच्या जप्त केलेल्या संपत्तीत ठाण्यातील दोन फ्लॅट आणि काही जमिनींचा समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार, एनएसीएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. मध्यंतरी सरनाईक प्रकरणानी संबंधित सर्व तपासकार्य थंडावले होते. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला होता. मालमत्ता जप्त झाल्याने आता या नव्या कारवाईने शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला जबरदस्त धक्का मिळाल्याचे बोलले जात आहे.