राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि रत्नागिरीतील जेष्ठ नेते सुहास वामन उर्फ कुमार शेट्ये यांचे शुक्रवारी दुपारी येथील एका खाजगी रूग्णालयात दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७४ वर्ष होते. काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. शरद पवारांचे ते विश्वासू सहकारी होते. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करताच ते राष्ट्रवादीचे काम करू लागले. पक्षाचे जिल्हाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. शरद पवार आणि त्यांचा उत्तम स्नेह होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून ते कार्यरत होते. त्यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी तालुक्यात काँग्रेस रुजवण्याचे काम केले. शिरगावचे सरपंच म्हणूनही त्यांनी काम पाहिले. रत्नागिरी पंचायत समितीवर ते निवडून आले. पंचायत समितीचे सभापतीपद देखील त्यांनी भूषविले. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
शरद पवारांचे ते विश्वासू सहकारी होते. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करताच ते राष्ट्रवादीचे काम करू लागले. पक्षाचे जिल्हाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. शरद पवार आणि त्यांचा उत्तम स्नेह होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून ते कार्यरत होते. त्यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी तालुक्यात काँग्रेस रुजवण्याचे काम केले. शिरगावचे सरपंच म्हणूनही त्यांनी काम पाहिले. रत्नागिरी पंचायत समितीवर ते निवडून आले. पंचायत समितीचे सभापतीपददेखील त्यांनी भूषविले. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही ते खा. पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते. मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती.
मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना रत्नागिरीत आणण्यात आले होते. शुक्रवारी रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच राष्ट्रवादीसह शिवसेना, भाजपा, काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात व घरी धाव घेतली. अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून त्यांना ओळखले जात होते. सर्व पक्षीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ज्येष्ठ नेते म्हणून जिल्ह्यात त्यांना ओळखले जात होते. शुक्रवारी रात्री त्यांच्यावर शिरगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने लोकं उपस्थित होते. अजातशत्रू व्यक्तीमत्व असलेल्या कुमार शेट्ये यांच्या निधनाने रत्नागिरीत हळहळ व्यक्त होत आहे.