25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeRatnagiriनिष्ठावंत शिवसैनिक उदय बने यांची सनसनाटी मुलाखत

निष्ठावंत शिवसैनिक उदय बने यांची सनसनाटी मुलाखत

राजकारणातून दूर जात असलो तरी जनतेची सेवा वेगळ्या मार्गाने मी सदैव करत राहणार आहे.

‘गेली ४५ वर्ष शिवसेनेचे निष्ठेने काम केले…. पक्षाने दिली ती जबाबदारी सांभाळली… स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने भारावलो… गावागावात शिवसेना रूजविली. कधी पद स्वतः हुन मागितलं नाही. आत्ताही विधानसभा निवडणुकीसाठी मी इच्छूक नव्हतो… कार्यकत्यांचा आग्रह होता… संपूर्ण कार्यकारिणीने (तालुकाप्रमुख आणि जिल्हाप्रमुख वगळून) एकमुखाने माझ्या नावाची शिफारस केली. स्वाभाविकपणे या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार होईल असे वाटत होते. मात्र तसे काही झाले नाही. निष्ठावंत शिवसैनिकाला डावलून ज्यांनी १९९९ पासून तालुक्यात शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला, शिवसैनिकांना हिणवले अशा नेत्याला पक्षात आयात करून उमेदवारी दिली. त्याचवेळी मी ठरवलं… की शिवसेना हा विषय आता माझ्यासाठी संपला. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तो मी मागे घेतला आहे,’ अशा रोखठोक शब्दात ज्येष्ठ नेते आणि जि.प. चे भूतपूर्व उपाध्यक्ष उदय बने यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ना. उदय सामंत यांनी मला आपण एकत्र येवूया अशी विनंती केली. उदय बने यांची ताकद काय आहे ते सामंतसाहेबांना कळले परंतू आमच्या उबाठाच्या (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांना कळले नाही. उदय सामंत यांचा मी आभारी आहे त्यांनी चांगले काम करावे मी नक्की त्यांच्या पाठिशी असेन अशी ग्वाही देखील उदय बने यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून दिली आहे.

टाइम्स डिजिटलला मुलाखत – दै. रत्नागिरी टाइम्स परिवारातील नवे भावंड म्हणजे ‘टाइम्स डिजिटल’ न्यूज चॅनल. अल्पावधितच हे चॅनल लोकप्रिय झाले आहे. विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर जि.प.चे माजी उपाध्यक्ष उदय बने यांनी टाइम्स डिजिटल चॅनलला विशेष मुलाखत दिली. पत्रकार श्री किशोर मोरे यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत उदय बने यांनी रोखठोक शब्दात आपली भुमिका मांडली. गेली ४५ वर्ष शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकावर अन्याय होत असेल तर काय अर्थ आहे असे सांगत शिवसेना हा विषय आता आपण थांबवला आहे. राजकारण थांबले असले तरी समाजकार्य सुरुच राहणार आहेः पक्षविरहित काम करत राहणार आहे असे उदय बने यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले.

नेमके काय घडले? – या मुलाखतीत उदय बने यांनी विधानसभा निवडणुकीसाठीचा उमेदवार निश्चित करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबोठा) पक्षामध्ये नेमके काय घडले ते सविस्तरपणे सांगितले. गेली काही वर्ष शिवसेनेचे कोणतेही पद माझ्याकडे नाही. साधा बूथप्रमुख देखील मी सध्या नाही. मात्र शिवसैनिक हे पदच माझ्यासाठी खुप काही होते. त्याच न्यायाने लोकसभा निवडणुकीच्यावेळी मी स्वतः तत्कालिन खासदार आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उबाठाचे उमेदवार विनायक राऊत यांना भेटलो. मला काम द्या, कोणतीतरी जबाबदारी द्या अशी मागणी केली. अर्थात पद नाही म्हणून काम करणार नाही अशी माझी भुमिका नव्हती तर एखादी जबाबदारी मिळाली की त्या अनुषंगाने अधिक स्पष्टपणे काम करता येईल. त्याचा उपयोग पक्षासाठी हीईल यासाठी माझा आग्रह होता.

मतदारसंघात मताधिक्य – माझ्यासारख्या अनेक शिवसैनिकांनी केलेल्या परिश्रमामुळे रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघात लोकसभेला आपल्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले. महायुतीपेक्षा महाविकास आघाडी या मतदारसंघात आघाडीवर होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु झाली. तेव्हा रत्नागिरीतील आठवडा बाजार येथील शिवसेनेच्या कार्यालयात मला बोलावण्यात आले. मी गेलो तेव्हा तेथे जिल्हाप्रमुख, आमदार, माजी खासदार, तालुकाप्रमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाचे निरिक्षक आमंदार मिलिंद नार्वे कर हेदेखील उमेदवारी संदर्भात मत जाणून घेण्यासाठी आले होते.

एकमुखी शिफारस – आपण यावेळी निवडणुकीसाठी इच्छूक नाही अशी माझी भुमिका मी तिथे मांडली. मात्र जिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुख वगळता रत्नागिरी तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व कार्यकारिणीने एकमुखाने रत्नागिरी- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून माझी शिफारस केली. पक्षनिरिक्षक मिलिंद नार्वेकर यांच्यासमोर सर्वांनी एकमुखाने माझे नाव उमेदवार म्हणून सुचविले. मी स्वतः इच्छूक नव्हतो मात्र गेली अनेक वर्षे ज्या सहकाऱ्यांसमवेत मी पक्षाचे काम कैले त्या सर्व सहकाऱ्यांनी एकमुखाने उमेदवारीसाठी माझे नाव सुचविले. त्यांचा आग्रह मी डावलू शकत नव्हतो.

मातोश्रीवर काय झाले? – संपूर्ण कार्यकारिणीने एकमुखाने माझे नाव उमेदवारीसाठी मातोश्रीवर पाठविले होते. त्यानंतर मातोश्रीवरही मला बोलावण्यात आले. तेथे मी माझी भुमिका स्पष्टपणे मांडली. गेली ४५ वर्ष मी निष्ठेने शिवसेनेचे काम करत आहे. त्यामुळे मला उमेदवारी मिळेल असे वाटत होते. माझी उमेदवारी जवळपास निश्चितही झाली होती. मात्र दुसऱ्यादिवशी अचानक काय झाले म ला माहितही नाही. भाजपचे नेते आणि माजी आमदार बाळ माने यांचा पक्षात प्रवेश झाला आणि लगेचच त्यांना उमेदवारीदेखील देण्यात आली. बाळ मानेंना उमेदवारी मिळाली म्हणून नाही परंतू पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून ज्यांनी १९९९ पासून या मतदारसंघात शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला, शिवसैनिक हे स्वतःच्या पालखीचे भोई आहेत असे हिणवले त्या व्यक्तीला शिवसेनेने अधिकृत उमेदवारी दिली हा माझ्यासाठी धक्का होता.

हेच निष्ठेचे फळ आहे का? – मनात त्यावेळी अनंत भावनांचा कल्लोळ निर्माण झाला होता. ४५ वर्ष काम केल्यानंतर आणि संपूर्ण कार्यकारिणींने एकमुखाने शिफारस करूनही निष्ठावंतांना डावलून उमेदवार आयात केला गेला याचे मोठे दुःख झाले. मला तिकीट मिळाले नाही परंतू माझ्यासोबत पक्षामध्ये काम करणारे अन्य निष्ठावंतही होते. त्यांना तरी उम `दवारी मिळायला हवी होती. मात्र तसे घडले नाही. कार्यकर्ते नाराज झाले. त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याला बंड असे म्हणता येणार नाही. निष्ठावंत शिवसैनिकांच्या आग्रहास्तव मी अर्ज दाखल केला. मात्र अपक्ष लढणे हे माझ्या तत्वात बसत नाही. म्हणून मी तो मागे घेतला असे स्पष्टपणे उदय बने यांनी सांगितले.

उमेदवारी का नाकारली ? – रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मला उमेदवारी का नाकारली असा प्रश्न केवळ मलाच नव्हे तर कार्यकत्यांनाही पडला होता. त्याचे उत्तर अजूनही मिळाले नाही. निष्ठावंतांनी अवहेलना किती काळ सोसायची. माझे नाव सुचविणाऱ्या सर्वांचा मी ऋणी आहे असे उदय बने यांनी सांगितले.

मी काम करणार नाही! – गेली ४५ वर्ष मी शिवसेनेचे काम करत होतो. आता शिवसेना हा विषय मी थांबविला आहे. प्रचारात मी सहभागी होणार नाही. पक्षप्रमुखांच्या सभेला देखील मी जाणार नाही. राजकारणातून दूर जात असलो तरी जनतेची सेवा वेगळ्या मार्गाने मी सदैव करत राहणार आहे असे उदय बने यांनी मुलाखतीच्या शेवटी स्पष्टपणे सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular