29.9 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

भाजप ठरवणार निकाल की ‘निक्काल’, चाकरमानीही ठरणार प्रभावी

विधानसभेसाठी जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत झालेले मतदान हे...

दापोलीत उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

दापोली विधानसभा मतदारसंघात ६० टक्के मतदान झाले...

मिरकरवाडा जेटीवर मतदानामुळे शुकशुकाट – मच्छीमारांची सुटी

शहरात तसेच नजीकच्या परिसरात लोकशाही महोत्सवात मतदान...
HomeRatnagiriसेतूमध्ये अपूर्ण अर्जही स्वीकारणार, पालकमंत्र्यांकडून दिलासा

सेतूमध्ये अपूर्ण अर्जही स्वीकारणार, पालकमंत्र्यांकडून दिलासा

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या बाबीची तत्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना सेतूमध्ये एखादा पुरावा कमी असेल तर अर्ज स्वीकारा.

कार्यालय रत्नागिरीमधून वेगवेगळ्या दाखल्याचे अर्ज स्वीकारले जातात; मात्र त्या दाखल्याच्या अर्जाला एखादा कागद कमी असेल तर तो अर्ज संबंधित अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे स्वीकारला जात नाही; मात्र आता पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एखादा पुरावा (कागद) कमी असेल तरी अर्ज स्वीकारा आणि त्याच वेळी त्या पुराव्याची पूर्तता करण्यासाठी संबंधित अर्जदाराला सूचना करण्याचे आदेश त्यांनी दिले, अशी माहिती मजगांव सरपंच, शिवसेना विभाग संघटक फैयाज मुकादम यांनी दिली. फैयाज मुकादम यांनी ही बाब मंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

यातून सेतूमध्ये अनेकवेळा वादविवाद होत आहेत. त्यामुळे काहीतरी पर्याय काढावा, अशी त्यांची मागणी होती. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या बाबीची तत्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना सेतूमध्ये एखादा पुरावा कमी असेल तर अर्ज स्वीकारा आणि त्याच वेळी त्या पुराव्याची पूर्तता करण्यासाठी संबंधित अर्जदाराला सूचना करण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे आता अपूर्ण अर्ज स्वीकारल्यामुळे अर्जाच्या पावतीवरून शासकीय काम, शिक्षणप्रवेश घेणे सुलभ होणार आहे. अर्ज दाखल केल्याची पावती मिळाल्याने अर्जदारांच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular