33.2 C
Ratnagiri
Thursday, February 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRatnagiriस्मार्टमधून सात प्रक्रिया प्रकल्प मंजूर

स्मार्टमधून सात प्रक्रिया प्रकल्प मंजूर

२०२२-२३ या वर्षात जिल्ह्यासाठी १८ प्रस्तावांचे लक्ष्य होते.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण पर्यटन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विविध फळप्रक्रिया उद्योगांसाठी केलेल्या १८ पैकी ७ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. चार प्रस्ताव विविध कारणास्तव रद्द केले आहेत. लांजा येथील फणस प्रक्रिया आणि राजापूर येथील काजू प्रक्रिया उद्योग आठ महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. स्मार्ट योजनेंतर्गत समुदाय आधारित शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून शेतमाल विक्रीला चालना देण्यासाठी जास्तीत जास्त तीन कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. कोकणात जुन्या कंपन्या कार्यरत नाहीत आणि नवीन कंपन्या निकषात बसत नसल्याने स्मार्ट योजनेला प्रतिसाद मिळत नव्हता; मात्र गेल्या काही दिवसांत जिल्ह्याला दिलेले लक्ष्य पूर्ण झाले आहे.

यामध्ये शेतीबरोबर जोडधंदा करून शेतकरी, बागायतदारांचे उत्पन्न वाढवणे शक्य आहे. २५० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कंपनी स्थापन करून प्रस्ताव सादर करावयाचा आहे. त्यानंतर मागील तीन वर्षांत त्यांची उलाढाल पाच लाखापर्यंत आणि उत्पादन विक्रीसाठी खरेदीदारांसोबत करार झालेला असावा, असे निकष आहेत. जिल्ह्यामधून आंबा, काजू, नारळ, फणस, भाजीपाला प्रक्रिया प्रकल्पांसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या तयार झाल्या आहेत. तालुक्यातील शेतकरीही पुढे येत असून, त्यांनी पूर्वी केलेल्या उलाढालीचा आर्थिक लेखाजोखा सादर केला जात आहे. त्यामुळे राज्य शासनाकडूनही स्मार्टसाठी अधिकचे प्रस्ताव सादर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

२०२२-२३ या वर्षात जिल्ह्यासाठी १८ प्रस्तावांचे लक्ष्य होते. त्यातील ७ प्रस्तावांना अंतिम मंजुरी मिळाली आहे. चार प्रस्ताव रद्द केले असून, ७ प्रस्ताव प्राथमिक मान्यतेसाठी शासनाला सादर केले आहेत. लांजा येथील जॅकफ्रूट फार्मस् शेतकरी उत्पादक फणस प्रक्रिया उद्योगासाठी ५ कोटींचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील पहिला प्रस्ताव असून, त्यासाठी ३ कोटींचे अनुदानही मंजूर झाले आहे. या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, ८ महिन्यांत ते पूर्ण होईल. राजापूर येथील ९० लाखांचे काजू प्रक्रिया युनिटसाठी ५४ लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्याचबरोबर संगमेश्वर येथील नारळ प्रक्रिया उद्योगालाही अनुदान मंजूर केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular