25.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeEntertainmentशाहबाजच्या हातावर बनवलेला सिद्धार्थचा टॅटू पाहून, चाहते भावूक

शाहबाजच्या हातावर बनवलेला सिद्धार्थचा टॅटू पाहून, चाहते भावूक

शहनाजप्रमाणे शाहबाजही सिद्धार्थच्या खूप जवळचा होता.

शहनाज आणि सिद्धार्थ ‘बिग बॉस १३ ‘ मध्ये एकत्र दिसले होते. शोमधील फॅमिली वीक दरम्यान शाहबाज ‘बिग बॉस’च्या घरात आला होता आणि त्यानंतर त्याची सिद्धार्थसोबत मैत्री झाली. शोनंतर शाहबाज आणि सिद्धार्थची चांगली बॉन्डिंग झाली. त्याचबरोबर या शोमधील सिद्धार्थ आणि शहनाजच्या जोडीला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. शो संपल्यानंतरही दोघे अनेकदा एकत्र दिसले होते.

शहनाज गिल नुकतीच मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आली होती. यावेळी त्याचा भाऊ शाहबाज बादशाहही तिच्यासोबत दिसला. मंडपामध्ये फिरत असताना शहनाजने तिचा भाऊ शाहबाजचा हात धरला होता. यावेळी शाहबाजच्या हातावर बनवलेला टॅटूही स्पष्ट दिसत होता, जो त्याने सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर बनवला होता. या टॅटूमध्ये सिद्धार्थचा चेहरा बनवण्यात आला आहे.

दर्शनादरम्यान शहनाज भावाच्या हातावर बनवलेल्या सिद्धार्थच्या चेहऱ्याच्या टॅटूला स्पर्श करताना दिसली. यादरम्यान शहनाज पिवळ्या रंगाचा सूट आणि पलाझोमध्ये दिसली होती, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. दुसरीकडे, शाहबाज पांढऱ्या टी-शर्टसह क्रीम पँटमध्ये दिसला.

वास्तविक शहनाजप्रमाणे शाहबाजही सिद्धार्थच्या खूप जवळचा होता. आता हा टॅटू पाहिल्यानंतर सिद्धार्थचे चाहते खूप भावूक झाले असून, सिद्धार्थ आपल्या सर्वांच्या हृदयात कायम जिवंत राहील, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर देत आहेत. सिद्धार्थ यांचे २ सप्टेंबर रोजी वयाच्या ४० व्या वर्षी निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सिद्धार्थने झोपण्यापूर्वी काही औषधे घेतल्याचे सांगितले जाते. त्यानंतरच त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्याने जगाचा निरोप घेतला.

RELATED ARTICLES

Most Popular