26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraड्रग्ज प्रकरणातून आर्यन खान निर्दोष !!

ड्रग्ज प्रकरणातून आर्यन खान निर्दोष !!

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेमध्ये आसलेले आर्यन खान क्रुझ ड्रग्ज प्रकरण वेगळ्याच वळणाकडे गेले आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे आर्यनच्या आयुष्यात वादळ आले होते. पण आता आर्यन हळूहळू या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, तसेच या प्रकरणामध्ये एनसीबीकडून ज्या व्हॉट्सअप चॅटचा पुरावा म्हणून आधार घेण्यात आलं होते त्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीही नसल्याचं २८ ऑक्टोबरला दिलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतीमध्ये म्हटलं आहे.

आर्यन खान प्रकरणातील व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही,  तर आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. जे ड्रग्ज अरबाज खान आणि मुनमुनकडे सापडले आहेत, ते सापडलेले ड्रग्ज हे कमर्शिअल प्रकारातील नसून केवळ त्या व्यक्तीच्या सेवनापुरतिचे आहेत. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज, मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचं षडयंत्र रचलेलं दिसून येत नाही, अशी टिप्पणी २८ ऑक्टोबरला दिलेल्या जामीन आदेशात मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे. व्हॉट्सअॅप चॅटमध्ये कोणताही कट रचलेलं दिसून येत नाही असं देखील कोर्टानं म्हटल आहे.

पाहायला गेलं तर याच व्हॉट्सअप चॅटच्या आधारे आर्यन खानची कोठडी वाढवण्यात आली होती. पण ज्यावेळी उच्च न्यायालयाने हे सर्व पुरावे पाहिले त्यावेळी आर्यन या व्हॉट्सअप चॅटमध्ये आक्षेपार्ह असे काहीही नव्हते किंवा त्यामध्ये ते कोणत्याही षडयंत्राचा अथवा कात कारस्थानचा भाग असल्याचे निदर्शनास येत नाही असं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आहे.

या प्रकरणात अरबाज खानकडे ५ ग्रॅम ड्रग्ज सापडले होते आणि एनसीबीने सांगितलं होतं की, आर्यन खान हा त्याचा मित्र असल्याने तोही या ड्रग्जचे सेवन करणार होता. त्याच आधारे आर्यन खानला महिनाभर तुरुंगात रहावं लागलं होतं. पण चक्क आता आर्यन खान या ड्रग्ज प्रकरणातून निर्दोष सुटत असल्याचे दिसून येत आहे!

RELATED ARTICLES

Most Popular