28.6 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeEntertainmentसोशल साईटवर शाहरूख खानचा जुना व्हिडीओ व्हायरल

सोशल साईटवर शाहरूख खानचा जुना व्हिडीओ व्हायरल

माझा मुलगा ड्रग्ज, डेट, सेक्स करू शकतो असे वादग्रस्त वक्तव्य शाहरुख खानने केले होते.

कार्डोलिया क्रुझ मुंबईवरुन गोव्याला चालली असताना, जशी ही क्रुझ मुंबईवरुन निघाली तशी ड्रग्ज पार्टीला सुरुवात झाली. एनसीबीची टीम आधीपासूनच क्रुझवर हजर असल्याने, मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा  मिळाल्यानंतर क्रुझ मुंबईकडे वळवण्यात आली. या छाप्यामध्ये बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव समोर आले आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या टीमकडून ही कारवाई करण्यात आली.

एनसीबीकडून त्याची चौकशी सुरु असतानाच आता सोशल साईटवर शाहरूख खानचा जुना व्हिडीओ व्हायरल झालेला दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा शाहरुखचा हा व्हिडीओ म्हणजे सिमी ग्रेवालने शाहरूखची घेतलेली एक जुनी मुलाखत आहे. त्यामध्ये ती शाहरूखला प्रश्न विचारते की, तुम्ही आर्यनचे पालन-पोषण कसे करता?  यावर शाहरूख बिनदास्त अंदाजामध्ये सांगतो आहे कि, मी माझ्या तरुणपणामध्ये न केलेली कामे आर्यनने करावीत. माझ्या तरुणपणात इच्छा असूनदेखील, मला सुविधा उपलब्ध नसल्याने मी इच्छित कामे करू शकलो नाही. पण आर्यनच्या बाबतीत तसे नाही आहे, त्याने ती करावीत. माझा मुलगा ड्रग्ज, डेट, सेक्स करू शकतो असे वादग्रस्त वक्तव्य शाहरुख खानने केले होते.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ १९९७ सालातील असून, आर्यनच्या भविष्यावर देखील तो बोलला आहे. जवळजवळ २७ मिनिटांच्या या संभाषणात शाहरुख आपल्या कुटुंबाच्या किती जवळ आहे, ते दिसून येते.

पण शाहरुखने तेंव्हा इच्छीलेली गोष्ट आर्यनने पूर्ण केली असल्याची चर्चा सोशल मिडीयावर जोर धरत आहे. भलेही त्यांचे हाय प्रोफाईल राहणीमान असेल, पण तरीही एखाद्या पालकाकडून आपल्या मुलाकडून अशाप्रकारे अपेक्षा असाव्यात? याबद्दल जोरदार मतांतर सोशल मिडीयावर सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular