26.4 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeMaharashtraशनिशिंगणापूरमध्ये चौथरा आता पुरुष महिला सर्वांसाठीच खुला

शनिशिंगणापूरमध्ये चौथरा आता पुरुष महिला सर्वांसाठीच खुला

शनिवारपासून शनी शिंगणापूरमध्ये चौथ-यावर जाऊन भाविकांनी तेल अभिषेक करण्यास सुरुवात केली आहे.

शनि शिंगणापूरमध्ये चौथऱ्यावर महिलांना जाऊ देण्यावर काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्यानंतर आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शनि शिंगणापूरमध्ये चौथऱ्यावर महिलांना तैलाभिषेक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हा चौथरा आता सर्वांसाठीच खुला करण्यात आला आहे. पूर्वी सर्व भाविकांना चौथऱ्यावर जाऊन तैलाभिषेक करता येत होता. मात्र, काही वर्षे या ठिकाणी महिलांना प्रवेश बंद करण्यात आला होता.

२०१५ मध्ये भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी महिलांना चौथऱ्यावर प्रवेश मिळावा या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी भाविकांना केवळ पादुकांपर्यंत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता शनिवारपासून शनी शिंगणापूरमध्ये चौथ-यावर जाऊन भाविकांनी तेल अभिषेक करण्यास सुरुवात केली आहे. विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आता विश्वस्त मंडळाच्या बैठकीत पुरुषांसोबतच महिलांनाही तैलाभिषेक करण्यास प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. शनी शिंगणापूर मंदिराच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश बंदी होती. मात्र, २८ नोव्हेंबर २०१५ रोजी एका महिलेने हा नियम मोडला. जवळपास चारशे वर्षांच्या परंपरेचा नियम तिने मोडल्याचा बोलले गेले. मात्र, अनेकांनी या महिलेच्या धाडसाचे स्वागत करत ही नवी क्रांती असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वस्तांनी घेतलेल्या निर्णयानुसार शनिवारपासून भाविकांनी चौथ-यावर जाऊन तेल अभिषेक करण्यास सुरुवात केली,  असे सांगितले. मात्र, चौथ-यावर तेल अभिषेकासाठी भाविकांना श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टची ५०० रुपयांची देणगी पावती घ्यावी लागेल, असे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular