28.1 C
Ratnagiri
Thursday, June 1, 2023

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम...

वाघळी पकडणारा सातारचा संतोष यादव सर्फ फिशिंग स्पर्धेमध्ये प्रथम

रत्नागिरी फिशर्स क्लब आयोजित ओपन सर्फ फिशिंग...

आजपासून मासेमारी बंदी कालावधी सुरू , नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर

शासनाच्या निर्देशानुसार १ जूनपासून मासेमारी बंदी सुरू...
HomeChiplunदिवा ते चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी चालू ठेवण्याची मागणी

दिवा ते चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी चालू ठेवण्याची मागणी

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सध्या दिवा ते रोहा मार्गावर धावणाऱ्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या रोहा ते चिपळूण अशा विस्तारित करण्यात आल्या आहेत;

कोकण रेल्वेने कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने गणेशोत्सवासाठी १९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत मेमू स्पेशल गाडी सुरू करण्यात आली आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सध्या दिवा ते रोहा मार्गावर धावणाऱ्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या रोहा ते चिपळूण अशा विस्तारित करण्यात आल्या आहेत;  मात्र आम्ही दादर ते चिपळूण या गाडीची गेले अनेक वर्षे मागणी केली आहे. ती गाडी अद्याप सुरू करण्यात आलेली नसून एकप्रकारे कोकण वासीयांवर अन्याय झाल्याचे कोकण निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी म्हटले आहे.

याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांचीही भेट घेतली होती. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आश्वासन दिले होते. चिपळूण व परिसरातील जनतेसाठी मुंबईत खरेदीसाठी जाण्यासाठी ही गाडी आवश्यक आहे. ती चालू झाली नसली तरी आता केवळ गणेशोत्सवासाठी सुरू केलेली दिवा ते रोहा ही मेमू गाडी कायमस्वरूपी विस्तारित करून दिवा-चिपळूण अशी चालवावी व या भागातील प्रवाशांची गैरसोय दूर करून ती कायमस्वरूपी चालू ठेवावी, अशी मागणीही अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष मुकादम यांनी केली आहे.

कोकण रेल्वे प्रशासनाने आता गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर रोहा-चिपळूण दरम्यान मेमू स्पेशल गाडी चालवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला असून, आठ डब्याची ही गाडी शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर ही गाडी बंद न करता ती कायमस्वरूपी चालू ठेवावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular