21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriशीळ धरण ते जॅकवेल पाईपलाईन पूर्ण

शीळ धरण ते जॅकवेल पाईपलाईन पूर्ण

एकूण ५५० मीटर जलवाहिनीपैकी ५५ मीटर वाहिनी टाकून पूर्ण झाली आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे रखडलेले काम वेगाने सुरू झाले आहे. एकूण ५५० मीटर जलवाहिनीपैकी आतापर्यंत ५५ मीटर काम पूर्ण झाले आहे. पालिकेकडून होणार हे काम वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक व विद्यमान पदाधिकारी स्वतः लक्ष घालून आहेत. कालच त्यांनी घटनास्थळावर जाऊन कामाची पाहणी केली. रत्नागिरी शहरामध्ये सध्या पाण्याची टंचाई आहे. शहरवासीयांना शीळ धरणातील खालावलेल्या पाणीसाठ्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.

शीळ धरण ते पंपिंग हाऊसपर्यंत पाईपलाईन टाकण्यास झालेल्या विलंबाबाबत शहरवासीयांकडून ओरड सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या जलवाहिनी जोडण्याच्या कामाची शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी पाहणी केली, नळपाणी योजना पूर्ण झाली असताना पंपिंग हाऊसपर्यंत लाईन पूर्ण होणे आवश्यक आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी तातडीने करण्यात यावे यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. प्रसारमाध्यमांनी देखील हा विषय उचलून धरला.

ज्या फ्लोटिंग पंपाद्वारे सध्या जॅकवेलमध्ये पाणी लिफ्ट केले जाते, तो फ्लोटिंग पंप अतिवृष्टीत वाहून गेला तर शहरावर पाणी संकट येण्याच्या भीतीने हा विषय उपस्थित करण्यात आला. शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम अधिक वेगाने व्हावे, यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शीळ धरणाला भेट दिला. शिवसेना शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, माजी ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, सुदेश मयेकर, विकास पाटील, विजय खेडेकर, अभिजित दुड्ये आदी उपस्थित होते.

५५ मीटर वाहिनीचे काम पूर्ण – एकूण ५५० मीटर जलवाहिनीपैकी ५५ मीटर वाहिनी टाकून पूर्ण झाली आहे. त्यासाठी नवीन पाईपलाईन उपलब्ध आहे. अजून ४६० मीटर जलवाहिनी टाकण्याचे काम बाकी आहे. हे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular