28.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

कशेडीतील एक भुयारी मार्ग आजपासून बंद…

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी दोन भुयारी...

महामार्ग चौपदरीकरणाचे ऑडिट करा – वाहनचालकांची मागणी

मागील १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम...

एकच वादा.. अजित दादा ! चिपळुणात उद्या राष्ट्रवादीचा आवाज घुमणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) पक्षाची...
HomeMaharashtraशासकीय नियमानुसार, श्री साईबाबांचे समाधी मंदिर ठराविक वेळेसाठी दर्शनासाठी बंद

शासकीय नियमानुसार, श्री साईबाबांचे समाधी मंदिर ठराविक वेळेसाठी दर्शनासाठी बंद

चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ ते सकाळी ६ या कालावधीमध्ये शासकीय नियमानुसार, श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.

सध्या देशात आणि राज्यामध्ये कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन व्हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेता पुन्हा राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत. त्यानुसार २५ डिसेंबर २०२१ पासून रात्री ९ ते सकाळी ६ नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य शासनाच्या दिनांक २४ डिसेंबर २१ रोजीच्या कोविड-१९ संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी लागू केल्याने, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ ते सकाळी ६ या कालावधीमध्ये शासकीय नियमानुसार, श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.

त्या अनुषंगाने संस्थानच्यावतीने रात्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शन व आरतीसाठी भाविकांना बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त ३१ डिसेंबर रोजी रात्रीही श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.

तसेच राज्य शासनाचा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत श्री साईबाबा समाधी मंदिरातील रात्री १०.३० वाजताची श्रींची शेजारती व पहाटेची ४.३० वाजताची काकड आरती नियमित होणार असून याकरिता भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. याबरोबरच श्रींच्या दर्शनाकरिता सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.

त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये रात्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांचा एक प्रकारे हिरमोड होणार आहे. शासनाने पारित केलेले कोरोना नियम हे सर्वांसाठीच लागू असल्याने भाविकांनी याची दाखल घेण्याचे आवाहन संस्थानामार्फत करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular