25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeMaharashtraमुंबईत जोरदार राडा, तुफान दगडफेक शिंदे X ठाकरेंचे शिवसैनिक भिडले !

मुंबईत जोरदार राडा, तुफान दगडफेक शिंदे X ठाकरेंचे शिवसैनिक भिडले !

पोलिस ठाण्यामध्ये ३ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच मुंबईत मंगळवारी रात्री वादाची ठिणगी पडली. शिंदे आणि ठाकरे या दोघांच्याही शिवसेनेचे सैनिक मध्यरात्री जोगेश्वरी मतदारसंघात एकमेकांना भिडले. त्यामुळे जोरदार राडा झाला. जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याने, वातावरण चांगलेच तापले होते. महायुतीच्यावतीने मतदारसंघात पैसे आणि वस्तुंचे वाटप सुरु असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केला असून त्यावरूनच दोन्ही गटातील शिवसैनिक एकमेकांना भिडले. या राड्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवर ३ वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झाल्याने ठाकरेंचे शिवसैनिक कमालिचे संतापले आहेत. दरम्यान जोगेश्वरीतील परिस्थिती नियंत्रणात आहे असा दावा पोलीसांनी केला आहे. खासदार रविंद्र वायकर यांच्या पत्नी सौ. मनिषा वायकर या जोगेश्वरीम धून शिवसेना शिंदे गटाच्यावतीने निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात. ठाकरे गटाने बाळा नर यांना उमेदवारी दिली आहे.

पैसे वाटप होत असल्याचा आरोप – जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचे कार्यकर्ते महिलांना पैसे आणि काही वस्तू वाटप करत असल्याचे सोशल मिडियावर व्हायरल होताच मंगळवारी रात्री ठाकरे गटाचे कार्यकर्ते मातोश्री क्लब येथे जाब विचारायला गेले होते. त्याचवेळी शिंदे गटाचे आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने जोरदार राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव मातोश्री क्लबबाहेर जमला होता. यावेळी वायकरांच्या कार्यकर्त्यांनी गेटच्या आतून दगडफेक केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला.

नेमकं काय घडलं? – जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार स्वींद्र वायकर यांचे कार्यकर्ते महिलांना पैसे आणि काही वस्तू वाटप करत असल्याचे वृत्त मंगळवारी रात्री म. तदारसंघात वाऱ्यासारखे पसरले. यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते वायकर यांच्या मातोश्री क्लब येथे जाब विचारायला गेले होते. त्याचवेळी शिंदे गटाचे आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने जोरदार राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव मातोश्री क्लबबाहेर जमला होता. यावेळी दगडफेक केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. त्यामुळे मातोश्री क्लबच्या बाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

३ गुन्हे दाखल – या राड्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये ३ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला गुन्हा शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या मुलीचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग केल्याचा दाखल करण्यात आला आहे. दुसरा गुन्हा मातोश्री क्लबाहेर १५ ते २० मि निटं जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड बंद केल्याप्रकरणी दाखल करण्यात आला आहे आणि तिसरा गुन्हा म्हणजे ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांच्या अंगावर गेल्याप्रकरणी चार ते पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. अशाप्रकारे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर ३ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

आरोप-प्रत्यारोप – दरम्यान मंगळवारी रात्री झालेल्या राड्यानंतर शिंदे गटाच्या महिला नेत्या शीतल म्हात्रे यादेखील घटनास्थळी आल्या होत्या. त्यांनी ठाकरे गटावर आगपाखड केली, त्यांनी म्हटले की, ‘मातोश्री क्लबबाहेर ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते शूटिंग करत होते. आमच्या महिलांनी जाब विचारला तर कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलला. हे ठाकरे गटाचे संस्कार आहेत का? हा पवाल मला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना विचारायचा आहे”, असं शीतल म्हात्रे यांनी म्हटलं. “आम्हाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. काही गुंड प्रवृत्तीचे लोकं याठिकाणी आले होते, त्यांच्यावर कारवाई व्हावी”, अशी मागणी देखील शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी केली.

अनिल परब यांचा आरोप – ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब हेदेखील घटनास्थळी आले होते. त्यांनी शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर पैसे आणि भेटवस्तूंचे वाटप केले जात असल्याचा आरोप केला आहे. गुंडांच्या माध्यमातून पैसे, वस्तू वाटप झाल्याचा त्यांचा आरोप असून निवडणूक आयोग पक्षपाती वागत आहे. पोलीसही आमच्या तक्रारीची योग्य ती दखल घेत नाहीत असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular