26.7 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeChiplunपरशुराम घाटातील वाहतूक धोक्याचीच…

परशुराम घाटातील वाहतूक धोक्याचीच…

घाटमाथ्यावरून येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नियोजन केलेले नाही.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना परशुराम घाट अपघातप्रवणक्षेत्र बनला आहे. पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडी, खचणारा रस्ता यामुळे हा घाट चर्चेत असतानाच आता दररोज होणाऱ्या अपघातांमुळे या घाटातील वाहतुकीची ‘वाट’ सुद्धा ‘बिकट’च असल्याचेच दिसून येत आहे. यामुळे चौपदरीकरणानंतरही वाहनधारकांची सुरक्षितता आता रामभरोसे पाहायला मिळत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण ७५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील काही भाग तसेच आरवली ते राजापूर या भागातील चौपदरीकरण अजूनही पूर्ण होणे बाकी आहे. याशिवाय महामार्गावरील बहुतांश उड्डाणपूल अद्यापही अपूर्णावस्थेतच आहेत. परशुराम घाटात काँक्रिटीकरण करताना पावसाच्या तोंडावर टेकडीवरील माती खणून दरीच्या बाजूला भराव केला आणि त्या भरावावर त्याचवर्षी काँक्रिटीकरण करण्यात आले. घाटमाथ्यावरून येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नियोजन केलेले नाही.

पेढे, परशुराम ग्रामस्थांच्या दबावामुळे काही ठिकाणी मोऱ्या टाकण्यात आल्या; मात्र, पाणी जाण्यासाठी योग्य मार्ग न दिल्याने घाटात अनेक ठिकाणी रस्ता खचत आहे, दरडी कोसळत आहेत. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून कोसळलेल्या ठिकाणचा मार्ग बंद करून एकाच नार्गिकेवर दुतर्फा वाहतूक सुरू आहे. आता राष्ट्रीय महामार्गाकडून कोकण धर्तीवर दरडी कोसळू नयेत म्हणून लोखंडी जाळी व अन्य उपाययोजना करण्यासाठी निविदा काढण्यात येत आहेत. त्यामुळे आगामी काळात हे होणारे उपाय परशुराम घाटाला तारतील काय ? हा प्रश्न आहेच. त्यातच हे करत असतानाच पावसाळ्यात कोसळलेली दरडही उचललेली नाही. त्यामुळे घाटातून प्रवास करणे जिकरीचे झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular