22.2 C
Ratnagiri
Saturday, January 24, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriरत्नागिरी जि.प. साठी शिवसेना उमेदवारांची घोषणा

रत्नागिरी जि.प. साठी शिवसेना उमेदवारांची घोषणा

अॅड. महेंद्र मांडवकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली व अर्ज शनिवारी सादर केला.

रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून शिवसेना, भाजप महायुतीच्या वतीने पहिला उमेदवारी अर्ज शनिवारी पावस जिल्हा परिषद गटात दाखल झाला आहे. प्रसिध्द वकील आणि जिजाऊ संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेंद्र मांडवकर यांना या गटातून उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पालकमंत्री ना. उदय सामंत हेदेखील उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा परिषद व सर्वच पंचायत समित्यांमध्ये महायुतीला शंभर टक्के यश मिळेल असा विश्वास पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला. चिपळूणमध्ये राष्ट्रवादीसोबत मैत्रिपूर्ण लढत होणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दावोस दौऱ्यावर जाण्यापूर्वी शनिवारी रत्नागिरीत आलेल्या पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेसाठी रत्नागिरी, संगमेश्वर व गुहागरमधील काही गटांच्या उमेदवारांची तर रत्नागिरी पंचायत समि तीमधील काही गणांमधील उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील त्यांनी केली.

पहिला अर्ज सादर – रत्नागिरी तालुक्यातील पावस जि.प. गटामधून जिजाऊ संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेंद्र मांडवकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली असून त्यांनी आपला अर्ज शनिवारी सादर केला. जिल्ह्यात शिवसेनेच्यावतीनें सादर झालेला हा पहिला अर्ज आहे. यावेळी ज्येष्ठ नेते निलेश सांबरे यांच्यासह पालकमंत्री ना. उदय सामंत उपस्थित होते. दरम्यान पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यात खेडशी गटामधून हर्षदा भिकाजी गावडे, शिरगाव गटामधून श्रध्दा दीपक मोरे, गोळप गटामधून नंदकुमार उर्फ नंदा मुरकर, खालगाव गटातून शिवसेना तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रत्नागिरी तालुक्यात १० पैकी ५ जागांवर उमेदवारांची निवड जाहीर झाली आहे. तर संगमेश्वरमध्ये कसबा गटातून माजी जि.प. अध्यक्षा रचना राजेंद्र महाडीक, मुचरी गटातून माधवी गिते, गुहागर तालुक्यात वेळणेश्वर गटामधून नेत्रा ठाकूर, पडवे गटातून माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर यांची नावे पहिल्या यादीत जाहीर करण्यात आली आहेत. रत्नागिरी पंचायत समितीसाठी हातखंबा गणातून विद्या बोंबले, देऊड गणातून नेहा गावणकर, केळ्येमधून सुमेश आंबेकर तर नाणीजमधून डॉ. पद्मजा कांबळे, साखरतरमधून परेश सावंत यांना उमेदवारी पालकमंत्री ना. सामंत यांनी जाहीर केली आहे. खेड विधानसभा मतदार संघातील उमेदवार राज्यमंत्री ना. योगेश कदम हे लवकरच जाहीर करतील असे त्यांनी सांगितले.

चिपळुणात मैत्रीपूर्ण लढती – भाजपाचा सन्मान ठेवून त्याठिकाणी जागा सोडल्या जाणार आहेत. शिवसेना-भाजप युतीबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबरच भाजपा प्रदेशाध्यक्ष रैविंद्र चव्हाण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. युती करताना भाजपाला दिलेला शब्द जिल्हा परिषदेतही पाळला जाईल असे ना. सामंत यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीसोबत चिपळूणमध्ये मैत्रिपूर्ण लढती होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली तर संगमेश्वर तालुक्यांत राष्ट्रवादी सोबत महायुती निवडणुकीला सामोरी जाणार असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले. याबाबत चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्याशी चर्चा झाली आहे. लांजा-राजापूरमधील उमेदवार लवकरच जाहीर केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular