26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeDapoliदापोलीतील नाट्य शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई

दापोलीतील नाट्य शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई

एकाच संस्थेचे दोन वेगवेगळे कार्यक्रम झाल्याने लढाई सुरू असल्याचे दिसते.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दापोलीमध्ये महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. एकाच दिवशी दापोलीमध्ये दोन ठिकाणी कुणबी भवनाच्या निमित्ताने भूमिपूजनाचे कार्यक्रम पार पडले. त्यामुळे तालुक्यामध्ये महायुतीमध्ये सुरू असलेल्या वादांवर येथील जनतेमध्ये चर्चांना उधाण आले आहे. दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी स्वतःच्या मालकीची जागा कुणबी समाजोन्नती संघ या १०४ वर्षे जुन्या कुणबी समाजाच्या मातृसंस्थेला दिली आहे. संबंधित संस्थेकडून कुणबी भवनाचे भव्य भूमिपूजन शिवसेनेचे रामदास कदम व आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले; मात्र याच भवनासाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील दुसऱ्या ठिकाणी जागा दिली आहे.

कुणबी समाज भवनासाठी दापोलीसारख्या एका शहरात एकाच दिवशी दुसऱ्या ठिकाणी भूमिपूजन झाले. या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजक कुणबी समाजाचे नेते असून १० ऑक्टोबरला एकाच दिवशी हे कार्यक्रम पार पडले. एकाच संस्थेचे दोन वेगवेगळे कार्यक्रम झाल्याने शिवसेना- भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे दिसते. याच दिवशी भाजप व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या कुणबी समाज भवनाच्या दुसऱ्या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील पाटील मात्र उपस्थित होते.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही खासदार सुनील तटकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत दापोलीतील जाहीर सभेत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाचे विधानसभेचे उमेदवार व माजी आमदार संजय कदम यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश होणार आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष नगरसेवक साधना बोत्रे एकमेव शिलेदार दापोली नगरपंचायतीत असणार आहेत.

सुनील तटकरे यांची अनुपस्थिती – रामदास कदम व आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या कुणबी समाज भावनाच्या कार्यक्रमालाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांची अनुपस्थिती, हाही चर्चेचा विषय ठरला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular