34.1 C
Ratnagiri
Saturday, February 22, 2025

कांदळवन कार्यशाळेच्या खर्चाची चौकशी करा – पालकमंत्री उदय सामंत

कांदळवन व वनविभागाकडून नुकतेच एका आलिशान हॉटेलमध्ये...

रत्नागिरीत पोलिस दलात मोटारीसह ई-बाईक दाखल

पोलिसांनी आधुनिक उपकरणांचा उपयोग वापर जनतेसाठी करावा,...

रत्नागिरीतही आता हाऊसबोटी – पालकमंत्री उदय सामंत

काश्मीर आणि केरळनंतर रत्नागिरीतही हाऊसबोटी दाखल झाल्या...
HomeDapoliदापोलीत लवकरच शिवसेनेचा नगराध्यक्ष असेल : ना. योगेश कदम

दापोलीत लवकरच शिवसेनेचा नगराध्यक्ष असेल : ना. योगेश कदम

शिवसेनेचाच नगराध्यक्ष व्हावा यासाठीचा केलेला संघर्ष आज फळास आला आहे.

नगर पंचायत निवडणुकांच्यावेळी शिवसैनिकांनी केलेला संघर्ष आज फळास आल्याने लवकरच दापोली नगर पंचायतीवर शिवसेनेचाच नगराध्यक्ष विराजमान होईल, असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे. दापोलीमध्ये मंगळवारी राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दापोली नगर पंचायतीच्या ५ नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करत शिवसेनेमध्ये ना. योगेश कदम यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यांचे स्वागत करताना ना. कदम यांनी हा विश्वास व्यक्त केला. नगरपंचायतीच्या ज्यावेळेस निवडणुका झाल्या, त्यावेळेस आपल्या शिवसैनिकांनी संघर्ष केला होता. त्यावेळी जो काय अन्याय झाला, त्याला वाचा फोडण्याचे काम शिवसैनिकांनी केले. त्यावेळी नगरपंचायतीमध्ये आपण सत्ता स्थापन करू शकलो नाही. त्यावेळेस अपक्ष म्हणून निवडून आलेले आपले दोन नगरसेवक आज नगरपंचायतीमध्ये आहेत.

दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष व्हावा यासाठीचा केलेला संघर्ष आज फळास आला आहे. नगराध्यक्ष आपला होण्याच्या दृष्टीने या पाचही नगरसेवकांनी जो आमच्यावर विश्वास ठेवून प्रवेश केला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन योगेश कदम यांनी केले. कोणतीही अपेक्षा न ठेवता निव्वळ दापोली शहराचा जो विकास थांबला आहे तो होणे आवश्यक आहे. येणारा निधी जो थांबला आहे तो ताबडतोब येऊन विकासकामांना सुरुवात करणे गरजेचे आहे. याकरिता या ५ नगरसेवकांनी आज प्रवेश केला आहे. आपले पक्षप्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तसेच महायुतीच्या माध्यम ातून एकजुटीने या शहराचा विकास करायचा आहे. त्याकरिता मी मंत्री म्हणून नेहमीच तुमच्या पाठीशी उभा आहे, अशी ग्वाही यावेळी मंत्री ना. योगेश कदम यांनी दिली.

‘ज्यावेळी आम्ही उबाठा मध्ये प्रवेश केला, त्यावेळेस आम्हाला वाटले की, कुठेतरी आमच्या विभागामध्ये कामे होतील, परंतु एकही काम आजपर्यंत होऊ शकले नाही. दापोलीचे आमदार आणि राज्याचे मंत्री ना. योगेश कदम यांचा तालुक्यातील कामांचा झपाटा पाहून आम्ही ठरवलं की, आपल्या विभागांचा विकास व्हायला हवा असेल तर आपल्याला मंत्र्यांसोबत गेलं पाहिजे म्हणून आम्ही दुसरी कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त विकासकामांसाठीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे; असे दापोली नगरपंचायत नगरसेवक विलास शिगवण यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular