20.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeMaharashtraकेंद्रीय मंत्री नारायण राणेंवर विनायक राउतांनी केलेल्या टीकेवर निलेश राणेंचे प्रत्युत्तर

केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर विनायक राउतांनी केलेल्या टीकेवर निलेश राणेंचे प्रत्युत्तर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंत्रिपद मिळाल्यापासून, विरोधी पक्ष आणि त्यांच्यात अनेक वादाचे प्रसंग उद्धवत असतात. लोकसभेमध्ये झालेल्या एका चर्चेमध्ये डीएमकेच्या खासदार कनीमोळी यांनी राणे यांना प्रश्न इंग्रजी भाषेत विचारला होता. त्यावरून विनायक राउत आणि राणे पिता पुत्र यांच्यामध्ये वाड सुरु झाले आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वैर काही केल्या थांबताना दिसत नाही. राणे पिता-पुत्र आणि शिवसेनेतील नेत्यांची आरोप-प्रत्यारोप आणि टीका टिप्पणीची मालिका सुरुच आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा नारायण राणेंना डिवचलं आहे.

लोकसभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या खात्या अंतर्गत प्रश्न होता. लोकसभेत बोलण्याची राणेंची पहिलीच वेळ होती. अभ्यास तेवढा झाला की नाही माहिती नाही. त्यामुळे उत्तर देताना त्यांनी त्यांच्या पद्धतीमध्ये उत्तर दिले. यावर विशेष काही टीका टिप्पणी करणार नाही. फक्त एवढच बोलू इच्छीतो कि, जेवढा महाराष्ट्र सोपा आहे, तेवढी देशाची संसद सोपी आहे असं कुणी समजू नये.

स्वाभिमान पक्षाचे काही लोक हे विकृतीने पछाडलेले असल्याने त्यांना हिंदी काय, इंग्रजी भाषेचा संबंध नसतो. अगदी मराठीही नाही. त्यामुळे कुठे ना कुठे घाण करायचीच या पद्धतीने त्यांचं काम असते. लोकसभेत मला सुद्धा राणेंना प्रश्न विचारता आला असता, पण म्हटले ते आपलेच गाववाले आहेत, तर आपण दुर्लक्ष केलं पाहिजे असा सणसणीत टोला राऊत यांनी लगावला.

शिवसेना आणि भाजपचे राजकीय वितुष्ट कधी संपुष्टात येईल हे परमेश्वरालाच माहित. विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेला निलेश राणे यांनी मात्र थोडक्यात पण दणक्यात जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले कि, कोकणाची अब्रू घालवणाऱ्यांनी नारायण राणेंवर बोलू नये.

RELATED ARTICLES

Most Popular