28.6 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeKokan“त्या” ऑडीयो क्लीपवरून आरोप प्रत्यारोप सुरूच

“त्या” ऑडीयो क्लीपवरून आरोप प्रत्यारोप सुरूच

माजी आमदार संजय कदम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या विरोधात जेष्ट शिवसेना नेत्यांनेच रसद पुरवल्याचा आरोप केला आहे. तसेच,  यासंदर्भातील काही ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच, शिवसेना नेते रामदास कदम व शिवसेनेचा कार्यकर्ता यांच्यातील संभाषणाची आणि भाजपा नेते किरीट सोमय्या व त्या शिवसेना कार्यकर्त्याची देखील ऑडिओ क्लिप समोर आल्याने अजूनच चर्चांना उधाण आले आहे.

या संदर्भात शिवसेना नेते रामदास कदम यांनी यावर सर्व ऑडिओ क्लिपबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “या सर्व क्लिप खोट्या असून, त्यांचा मी धिक्कार करतो,  निषेध करतो. संजय कदम आणि वैभव खेडेकर यांना मी मोठं केलं आहे. विधानसभेत माझ्या मुलाने संजय कदम यांचा पराभव केल्याने, या दोघानी हे रचले आहे.

माझे आणि अनिल परब यांचे संबंध अत्यंत मैत्रीचे असून, मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो कि, मी सोमय्या यांना कधीही संपर्क साधलेला नाही. त्यांच्याशी कधीही माझा कधीच संबंध आला नाही किंवा आमची भेट झालेली नाही. हे राजकीय सूड बुद्धीने केल जात आहे. संजय कदम आणि वैभव खेडेकर यांनी यापूर्वीसुद्धा अश्या क्लिप केल्या आहेत. याबाबत मी यापूर्वीच उच्च न्यायालयात दावा केला आहे.

माझ्या पक्षाचा माझा विश्वास आहे. माझी पाठीत खंजीर खुपसण्याची भूमिका कधीच नसते आणि नव्हती. तसेच, “अनिल परब आणि माझे घट्ट मैत्रीचे संबंध आहेत. माझा मुलगा जिथे आमदार आहे,  तिथले पालकमंत्री म्हणून ते कायमच मदत करत असतात. म्हणून पक्षाच्या माध्यमातून मला बदनाम करणे, जेणेकरून पक्ष श्रेष्ठीच्या मनात माझ्याबद्दल किलमीश निर्माण होईल आणि तिथे खेडमध्ये आपली राजकीय पोळी भाजून घेणं सोप्प होईल. हा एक कलमी कार्यक्रम या माध्यमातून पाहायला मिळतोय. ” असाही रामदास कदम यांनी आरोप केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular