25.7 C
Ratnagiri
Tuesday, February 10, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeMaharashtraधनुष्यबाण गोठवल्यानंतर, गटाच्या नावाची आणि चिन्हांची लढाई थांबली

धनुष्यबाण गोठवल्यानंतर, गटाच्या नावाची आणि चिन्हांची लढाई थांबली

दोन्ही गटांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा वापर करता येणार नाही.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या नावाची आणि चिन्हांची लढाई अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर थांबली आहे. आयोगाने दि. १० रोजी सायंकाळी ठाकरे आणि शिंदे गटांसाठी नव्या नावाची आणि चिन्हांची घोषणा केली आहे. यात उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे.

तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले आहे.दरम्यान, शिवसेना हे नाव आणि या पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हे चिन्ह शनिवारी दि. ८ अंधेरी पोटनिवडणुकी पुरते गोठवल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. त्यामुळे दोन्ही गटांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा वापर करता येणार नाही. निवडणूक आयोगाने शिंदे गटाने सुचविलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या नावाला मान्यता दिली आहे. आपल्या नावात बाळासाहेबांचा उल्लेख असल्यामुळे शिंदे गटातील आमदारांसह समर्थकांनाही आनंद झाला.

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पक्षाची पर्यायी नावे आणि चिन्हे मागितली होती. यानंतर सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक चिन्ह आणि नावे आयोगाकडे पाठवली होती. अखेर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आयोगाने मोठी घोषणा केली. यामध्ये सोमवारी ठाकरे गटासाठी मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं. मात्र सोमवारी शिंदे गटाच्या निवडणूक चिन्हाचा निर्णय होऊ शकलेला नाही. बाळासाहेबांची शिवसेना हे जर नाव मिळाले असेल तर, नक्की बाळासाहेब कोण ? यावर सोशल मिडीयावर विविध प्रकारचे मिम्स व्हायरल होऊन खिल्ली उडवताना दिसत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular