रत्नागिरीमध्ये कोरोना प्रभाव काही प्रमाणात कमी आला आहे, परंतु, त्याची संख्या अजून स्थित झालेली नाही. दररोज बाधित सापडणाऱ्या संख्येमध्ये अजून संख्या कमी होणे गरजेचे असल्याने, लसीकरणावर जास्तीत जास्त प्रमाणात भार दिला जात आहे. संक्रमित रुग्णांची संख्या ग्रामीण भागातून जास्त सापडत असल्याने सरसकट गावामध्ये चाचण्या आणि लसीकरण करण्याकडे शासन भर देत आहे.
शिवसेनेतर्फे नाम.उदय सामंत यांच्या पुढाकाराने तरुण वर्गासाठी ३ दिवस लसीकरण मोहीम राबवण्यात आलेली. शासनाच्या लसीकरण कार्यक्रमानुसार १८ ते ३० वयोगटातील अनेक तरुणांना अद्याप लस मिळाली नव्हती. रत्नागिरीतील कोरोनाचा धोका लक्षात घेता, तरुणाईला कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी योग्य ती काळजी आणि लसीकरण हेच दोन प्रभावी उपाय असल्याचे अनेक वैद्यकीय तद्यांनी सांगितले आहे. ही गरज ओळखून शिवसेनेच्या वतीने तरुणांचे लसीकरण करण्याचा उपक्रम ना. सामंत यांनी मतदारसंघात राबवला.
तालुक्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांचे वेगवान गतीने लसीकरण होणे गरजेचे आहे, एकही व्यक्ती लसिकरणापासून वंचित राहू नये यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री नाम. उदय सामंत प्रयत्नशील आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि. २० जुलैपासून रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातील ग्रामीण भागातील सुमारे पंधरा हजार युवक-युवतींचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी दिली.
त्याचप्रमाणे गर्भवती महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लसीकरण करण्याबाबतच्या सूचना त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या आहेत. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, उप जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, आदी उपस्थित होते.