28.7 C
Ratnagiri
Thursday, August 7, 2025

रत्नागिरीजवळ भाट्ये येथे अपघात…

रत्नागिरी ते पावस जाणाऱ्या रस्त्यावर भाट्ये गावाकडे...

राजापूर तालुक्यामध्ये आढळली अतिदुर्मीळ ‘हंसतुरा’ प्रजाती

राजापूर तालुक्यात पावसाळ्यात उगवणारी, एक अतिदुर्मीळ आणि...

कोल्हापूरकरांसमोर ‘वनतारा’ झुकलं ! ‘महादेवी’ पुन्हा नांदणी मठात येणार

हत्तीणीला पुन्हा पाठवण्यात येणार आहे. वनताराचे सीईओ...
HomeChiplunशिवसेना उबाठा पक्षाला सोडून जाणाऱ्यांना नक्कीच पश्चाताप होईल: आ. भास्कर जाधव

शिवसेना उबाठा पक्षाला सोडून जाणाऱ्यांना नक्कीच पश्चाताप होईल: आ. भास्कर जाधव

खारवी समाज भवन येथे शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा पार पडला.

शिवसेना उबाठा पक्षाला सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांना नक्कीच पश्चाताप होणार आहे. त्यांनी स्वतः च्या पायावर धोंडा मारुन घेतला आहे. ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी गेले आहेत अशा शब्दात आमदार भास्कर जाधव यांनी समाचार घेतला. वेळणेश्वर जि. प. गटातील कार्यकर्त्यांचा हेदवी हेदवतड येथील खारवी समाज भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी आमदार भास्कर जाधव बोलत होते. वेळणेश्वर व पडवे गटातील गेलेले नेत्रा ठाकूर व महेश नाटेकर हे पदाधिकारी केवळ स्वार्थासाठी गेले आहेत. नेत्रा ठाकूर यांना जिल्हा नियोजन समितीवर जायचे असल्याने त्यांनी हा खटाटोप केला असून त्यांच्याबरोबर इतरांनाही त्यांनी नेऊन त्यांचे राजकीय भवितव्य नष्ट केले आहे. २०१७ मध्ये राष्ट्रवादीत मी असताना नेत्रा ठाकूर यांना मीच जिल्हा नियोजन समितीवर घेतले होते मात्र, त्याचे श्रेय त्या पालकमंत्र्यांना देत आहेत. याचाच अर्थ त्यांचे यापूर्वीच बोलणे झाले असावे म्हणून त्यांनी हा प्रवेश केला असावा, अशी शंका आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.

तालुक्याला आता चांगले वैभव आले होते, परंतु मी येथील खोतकी व लेखणीचा दहशतवाद संपविण्याचा प्रयत्न केला म्हणून आज मला संपविण्याचा प्रयत्न झाला. मात्र म ीच त्यांना संपविणार आहे, भास्कर जाधवला संपवायचे कोणाचे बापाचे काम नाही असा इशारा आमदार भास्कर जाधव यांनी दिला. आज जो खारवी समाज त्यांच्याबरोबर गेला आहे त्याच खारवी समाजाचे वेळणेश्वर येथील खारवी सभागृह पाडण्यासाठी नवनीत ठाकूर यांनी त्यावेळी संबंधित विभागाकडे तक्रार अर्ज केला होता. आता पुन्हा सीआरझेडच्या नियमावलीमुळे हे सभागृह पाडण्याची नोटीस आली असून ते वाचविण्यासाठी मीच उपयोगी येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. साखरी आगर जेटीसाठी निधी मी मंजूर करुन आणला आहे. तिचे बांधकाम मीच पूर्णत्वास नेणार आहे. वेळणेश्वर गटातील धूपप्रतिबंधक बंधारे वा रस्ते असोत ही कोटीची कामे मीच मंजूर करुन आणली असून ही कामे थांबवायला मला वेळ लागणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.

मी गुहागरमध्ये सुरुवातीला आलो तेव्हा येथे असा कोणता विकास होता, हे मला सोडून जाणाऱ्यांनी सांगावे, येथील विकास हा केवळ माझ्यामुळेच झाला आहे, असेही आ. जाधव यांनी नमूद केले. या सभेला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, ज्येष्ठ शिवसैनिक विनायक मुळे, तालुकाप्रमुख सचिन बाईत, जिल्हा महिला संघटक अरुणा आंब्रे, पानगळे गुरुजी, सचिन जाधव, खारवी समाजाचे नेते दत्ता शेठ वणकर, इमरान घारे, प्रवीण ओक, पांडुरंग कापले, सिताराम ठोंबरे, पूर्वी निमुंणकर, रवींद्र आंबेकर, विलास गुरव, जयदेव मोरे, स्नेहा वरंडे, स्नेहा भागडे, यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular