23.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriसलग ११ दिवस लसीकरण मोहीम – शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

सलग ११ दिवस लसीकरण मोहीम – शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

शिवसेनेने तरुणाईचे लसीकरण मोहीम राबविण्यासाठी पुढाकार घेतल्याने, आज २० ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीमध्ये १८ ते २९ वयोगटातील तरुणाईचे लसीकरण विभागनिहाय करण्याचे योजिले आहे. त्यामुळे दिनांक २० ऑगस्ट रोजी रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील लसीकरण कॅम्पचा आरंभ नाम. उदय सामंत यांच्य हस्ते संपन्न होणार आहे.

कोविडच्या या संकटामध्ये शासनाकडून दुर्लक्षित राहिलेल्या पिढीकडे ना. उदय सामंत यांनी लक्ष केंद्रित केले असून, आपल्या मतदार संघातील १८ ते २९ वयोगटातील तरुणांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. याआधी, दि. ७ जुलै ते ९ जुलै २०२१ या कालावधीमध्ये रत्नागिरी शहरातील ६५७२ तरुणांचे लसीकरण करण्यात आले होते. हा दोन दिवसाचा कॅम्प यशस्वी झाल्यावर ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील ग्रामीण विभागातील १५००० तरुणांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतलेला. ना.उदय सामंत आपल्या शब्दाला जागल्याने, दि.२० ऑगस्ट रोजी लसीकरण कॅम्प उद्घाटन हातखंबा जिल्हा परिषद गटामधील पाली येथील डी. जे. सामंत महाविद्यालय आणि  हातखंबा येथील सिध्दीगिरी मंगल कार्यालय येथे सुरू करण्यात आले आहे.

दि. २० ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२१ या ११ दिवसाच्या कालावधीमध्ये या लसीकरण कॅम्पचे नियोजन विभागनिहाय खालील प्रमाणे करण्यात आले आहे.

  • दि.२० ऑगस्ट रोजी हातखंबा जिल्हा परिषद गट –

हातखंबा पंचायत समिती गण – सिध्दीगिरी मंगल कार्यालय हातखंबा तिठा.

पाली पंचायत समिती गण – डी. जे. सामंत महाविद्यालय पाली

  • दि.२१ ऑगस्ट २०२१ रोजी करबुडे जिल्हा परिषद गट –

करबुडे पंचायत समिती गण – करबुडे हायस्कूल देऊड पंचायत समिती गण

बाबाराम कदम,ज्युनिअर कॉलेज जाकादेवी

  • दि. २३ ऑगस्ट २०२१ रोजी नाचणे जिल्हा परिषद गट कुवारबांव पंचायत समिती गण –

जि. प. शाळा कुवारबांव, ग्रामपंचायत कुवारबांव समोर

नाचणे पंचायत समिती गण – बालाजी मंगल कार्यालय, शांती नगर नाचणे

  • दि.२४ ऑगस्ट २०२१ रोजी हरचिरी जिल्हा परिषद गट –

कर्ला पंचायत समिती गण – टेंभ्ये हातिस ग्रामपंचायत

हरचिरी पंचायत समिती गण – चिंद्रवली ग्रामपंचायत

  • दि. २५ ऑगस्ट २०२१ रोजी पावस जिल्हा परिषद गट –

पावस पंचायत समिती गण – विद्यामंदिर पावस

गावखडी पंचायत समिती गण – सरस्वती विद्यामंदिर, गावखडी

  • दि. २६ ऑगस्ट २०२१ रोजी गोळप जिल्हा परिषद गट –

गोळप पंचायत समिती गण – ग्रामपंचायत गोळप हॉल

फणसोप पंचायत समिती गण – लक्ष्मीकेशव विद्यामंदिर फणसोप

  • दि. २७ ऑगस्ट २०२१ रोजी शिरगाव जिल्हा परिषद गट –

शिरगाव पंचायत समिती गण – जाकीमिया ग्रामपंचायत हॉल

कासारवेली पंचायत समिती गण – ओंकार मंगल कार्यालय बानखिंड, शिरगाव

  • दि.२८ ऑगस्ट २०२१ रोजी

कोतवडे जिल्हा परिषद गट – कोतवडे पंचायत समिती गण – घैसास हॉल कोतवडे

मालगुंड पंचायत समिती गण – महालक्ष्मी हॉल गणपतीपुळे

  • दि. २९ ऑगस्ट २०२१ रोजी

वाटद जिल्हा परिषद गट – वाटद पंचायत समिती गण – सर्वसाक्षी हॉल, वाटद

वरवडे पंचायत समिती गण – बापू जोशी हॉल, वरवडे.

  • दि.३० ऑगस्ट २०२१ रोजी नावडी जिल्हा परिषद गट –

नावडी पंचायत समिती गण – कोळंबे ग्रामपंचायत

फुणगुस पंचायत समिती गण – कोंडये ग्रामदेवता मंदिर

  • दि.३० ऑगस्ट २०२१ रोजी

मिरजोळे जिल्हा परिषद गट – मिरजोळे पंचायत समिती गण – मिरजोळे ग्रामपंचायत हॉल

फणसवळे पंचायत समिती गण – फणसवळे ग्रामपंचायत हॉल.

याप्रकारे नियोजन करण्यात आले आहे त्याचा त्या वयोगटात मोडणाऱ्या तरुणाईने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular