26.9 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeEntertainment... तोपर्यंत मी तुला ब्लॉक करत आहे – अभिनेता स्वप्नील जोशी

… तोपर्यंत मी तुला ब्लॉक करत आहे – अभिनेता स्वप्नील जोशी

सोशल मीडिया अकाउंटवर ती तिचे अनेक फोटो शेअर करते. तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टाइल आणि खासगी आयुष्याचीही अनेकदा चर्चा झाली.

श्रेया बुगडेनं गोवा ट्रीपचे फोटो शेअर केल्यानंतर नेटकरी आणि चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात येत आहे. ‘चला हवा येऊ द्या’ मधून मनोरंजनाच्या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे नेहमीच कोणत्या कोणत्या गोष्टीने चर्चेच असते. श्रेया तिच्या भटकंतीचे फोटो देखील चाहत्यांसोबत शेअर करत असते. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर निवांत क्षण असोत किंवा तिथले हटके कॅफे श्रेया खास गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत आहे. तसंच तिनं खास गोव्यातील फिश थाळीचा फोटोही शेअर केला आहे. त्यात तळलेला मासा, माश्याचं कालवण ,भात, सोलकढी अशा विविध पदार्थांनी भरलेल्या ताटाचा फोटोही तिनं शेअर केला आहे.

असा गोवन भरलेल्या ताटाचा हा फोटो पाहून कोणत्याही खाद्यप्रेमींनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. तर अनेकांनी तिला टोलाही लगावला आहे. श्रावण वैगेरे पाळत नाही का? असा खोचक प्रश्नही नेटकऱ्यांनी विचारला आहे. सोशल मीडिया अकाउंटवर ती तिचे अनेक फोटो शेअर करते. तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टाइल आणि खासगी आयुष्याचीही अनेकदा चर्चा झाली.

श्रेयानें शेअर केलेला फोटो पाहून अभिनेता स्वप्निल जोशी यानंही कमेट्स केल्या आहेत. स्वप्निलनं लिहिलं आहे की, ‘तू गोव्यात असेपर्यंत मी तुला ब्लॉक करत आहे. जेवणाचे हे फोटो आता मी अजून पाहू शकत नाही…’ स्वप्निलनं केलेल्या या कमेंट्सनंतर श्रेयानं त्याला चिडवण्यासाठी आणखी एक लज्जतदार थाळीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिने इन्स्टा स्टोरीला शेअर केला आहे. तसंच स्वप्निलला उत्तर देताना तिनं म्हटलं आहे की, ‘नका ना असं करू…’

RELATED ARTICLES

Most Popular