26.2 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeChiplunसावर्डेत बसस्थानक होण्याचे संकेत, तीस गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण

सावर्डेत बसस्थानक होण्याचे संकेत, तीस गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण

बसस्थानकाची सोय नसल्याने प्रवाशांना महामार्गावर बसची वाट पाहात उभे राहावे लागते.

चिपळूण संगमेश्वरदरम्यान सावर्डे येथे एसटी बसस्थानक होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्याचे कारण म्हणजे आमदार शेखर निकम यांनी सावर्डे येथे अद्ययावत एसटी बसस्थानक व्हावे व त्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी मिळावा, अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. सामंत यांनीही ही मागणी मान्य करून तशा आशयाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या वेळी निकम यांच्या समवेत सावर्डेचे उपसरपंच जमीर मुल्लाजी उपस्थित होते. सावर्डे हे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वसलेले गाव. परिसरात उभारलेल्या शैक्षणिक संस्थाचे जाळे, डेरवण येथील वालावलकर रुग्णालय, ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, क्रीडासंकुल, शिवसृष्टी आदी कारणांनी हा गाव शहरीकरणाच्या मार्गावर आहे. परिसरातील तीस गावांहून आधिक गावांना ही मध्यवर्ती बाजारपेठ असल्याने दररोज इथून हजारो लोकांची वर्दळ येथे होते. शेकडो विद्यार्थी बसने प्रवास करतात; मात्र या ठिकाणी बसस्थानकाची सोय नसल्याने प्रवाशांना महामार्गावर बसची वाट पाहात उभे राहावे लागते.

एसटी खात्याकडून मिळणाऱ्या विविध योजना व सवलतीचा लाभ घेता येत नाही. त्यासाठी बारा किलोमीटर दूर असलेल्या चिपळूण या ठिकाणी जावे लागते. प्रवाशांची व विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन आमदार निकम यांनी सावर्डे येथे सुसज्ज एसटी बसस्थानक उभारणीकरिता लक्ष घातले आहे. निकम यांनी उद्योगमंत्री सामंत यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांच्याशी एसटी बसस्थानक होण्याबद्दल चर्चा केली, तसेच सामंत यांच्याकडे औद्योगिक विकास महामंडळ निधीतून स्थानक उभारणीकरिता एक कोटी रुपयाचा निधी मिळावा, अशी मागणी केली. सामंत यांनीही तत्काळ बसस्थानक उभारणीकरिता एक कोटी रुपये निधी देण्याचे मान्य केले. तसा आशयाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिले. मंत्री सामंत व निकम यांचे मित्रत्वाचे सबंध असल्याने एसटी बसस्थानकाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास उपसरपंच जमीर मुल्लाजी यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular