26.2 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeChiplunनद्या गाळमुक्त करण्यासाठी आ. शेखर निकम यांची नाना पाटेकरांना साद

नद्या गाळमुक्त करण्यासाठी आ. शेखर निकम यांची नाना पाटेकरांना साद

या दोन्ही प्रश्नावर पाटेकर यांच्याकडून सहकार्याची हमी देण्यात आली.

जिल्ह्यातील विविध नद्यांमधील गाळ उपसा करण्यावर नाम फाऊंडेशन व जलसंपदा विभाग यांच्यात झालेला करार या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी रविवारी पुणे येथे जाऊन नाम फाऊंडेशनचे संस्थापक, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची भेट घेतली. चिपळूणसह संगमेश्वरमधील उपनद्यातील गाळ उपसा आणि संगमेश्वर तालुक्यातील कोंढरण गावच्या पुनर्वसनाबाबत चर्चा केली. या दोन्ही प्रश्नावर पाटेकर यांच्याकडून सहकार्याची हमी देण्यात आली. गाळ उपसा महापूरानंतर नाम फाऊंडेशनने चिपळूणला भरभरून मदत करताना शिवनदी गाळमुक्त केली.

त्याचबरोबर दसपटीतील ओवळी गावातील धनगरवाडीतील सुमारे २२ ते २५ कुटुंबाना आकले येथे घरे बांधून त्यांच्या पुर्नवसनाची मोठी जबाबदारी उचलली. अशातच आता जिल्ह्यातील १५ नद्यांमधील सुमारे १४ ते १५ लाख घनमीटर गाळ उपसण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नाम फाउंडेशन व जलसंपदा विभाग यांच्यात दोन आठवड्यापूर्वीच ‘सामंजस्य करार झाला.. यामध्ये जलसंपदा विभागाकडे असलेल्या चिपळूण वाशिष्ठी नदीम धील ३ लक्ष घनमीटर गाळ काढण्यात येणार आहे याचबरोबर संगमेश्वरमधील उपनद्यांतील गाळ उपसासाठी या करारात समावेश आहे.

या सर्व पार्श्वभुमीवर आमदार निकम यांनी पत्नी माजी सभापती पुजा निकम् सुपुत्र अनिवृध्द निकम यांच्यासमवेत नुकतीच पुणे येथे जाऊन नाना पाटेकर यांची निवासस्थानी सदिच्छा भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी पाटेकर यांनी निकम आणि त्यांच्या कुटुंबियांचे यथोचित स्वागत केले. यानंतर चिपळूण शहरासह रत्नागिरी जिल्ह्यात चालू असलेल्या गाळ काढण्याच्या कामासंदर्भात चर्चा झाली तसेच कृषी, जलसंवर्धन या विषयावर देखील प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी दोघांनीही रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आपापली मते मांडली.

चिपळूणसाठी संगमेश्वरमधील गाळ उपसाबरोबरच संगमेश्वर तालुक्यातील कोंढूण गावच्या पुनर्वसनावर चर्चा झाली या गावात यापुर्वीच झालेल्या मुस्सखलनाने तेथील घरांना धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात ग्राम स्थाना दोन महिने घर सोडून अन्यत्र रहावे लागते. त्यामुळे ज्याप्रमाणे ओवळी-धनगरवाडीला आक़ले येथे घरे बांधून दिली गेली तशाच पध्दतीने कोंढरण गावासाठी नाम फाऊंडेशनने पुनर्वसन प्रकल्प राबवावा अशी विनंती आमदार शेखर निकम यांनी नाना पाटेकर यांच्याकडे केली. गाळ उपसा आणि कोंढरण पुनर्वसन प्रकल्प यावर नाम फाउंडेशन सकारात्मक पाऊल उचलेल असे आश्वासन नाना पाटेकर यांनी आमदार निकम यांना दिले.

RELATED ARTICLES

Most Popular