25.6 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeRatnagiriजिल्ह्यातील १५ नद्यांतील होणार गाळाचा उपसा - नाम फाउंडेशन

जिल्ह्यातील १५ नद्यांतील होणार गाळाचा उपसा – नाम फाउंडेशन

अतिवृष्टीत नदीकाठच्या रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यातील १५ नद्यांमधील सुमारे १४ ते १५ लाख घनमीटर गाळ उपसण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नाम फाउंडेशन व जलसंपदा विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला. यामुळे अतिवृष्टीत नदीकाठच्या रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील एकूण १५ पैकी ११ नद्या या जलसंधारण तर ४ नद्या या पाटबंधारेच्या अखत्यारीतील आहेत. जलसंपदा विभागाकडे असलेल्या ४ नद्यांमध्ये चिपळूण वाशिष्ठी नदीमधील ३ लक्ष घनमीटर, जगबुडी नदीतील ३.५ लक्ष घनमीटर, अर्जुना नदीतील ०.७ लक्ष घनमीटर, कोदवली नदीमधील ०.५ दशलक्ष घनमीटर गाळ काढण्यात येणार आहे.

माखजन नदीतील २९ हजार ८५० घनमीटर, जामदा नदीतील १२ हजार ७७५ घनमीटर, सोनवी नदीतील लोवले येथील २२ हजार ५०० घनमीटर, कांदोशी सूर्यगंगा नदीतील ४७ हजार २५० घनमीटर तसेच रत्नागिरी तालुक्यातील चांदोर बौद्धवाडी येथील ९२ हजार २३८ घनमीटर, धामणसे येथील सोमगंगा नदीतील १ लाख ४४ हजार ५८३ घनमीटर, गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा, ब्राह्मणवाडी भाटकरी येथील २२ हजार ५०० घनमीटर, मंडणगडातील वेसवी येर्थील २५ हजार २०० घनमीटर, कुडुक थोरलापार नदीतील ४७ हजार ८८० घनमीटर आणि धाकटी पार नदीतील ४० हजार ८०० असा सुमारे ५ ते ७ लाख घनमीटर गाळ काढण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular