29.1 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeSindhudurgसिंधुदुर्गातील दोन्ही डोसचे लसीकरण ७५% पूर्ण

सिंधुदुर्गातील दोन्ही डोसचे लसीकरण ७५% पूर्ण

जिल्ह्यात सर्वात प्रथम ४५ वर्षावरील नागरिकांना कोविशिल्ड व कोवॅक्सिन लस देण्यास सुरुवात करण्यात आली होती.

जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण पुन्हा वाढू लागले असून १२ वर्षावरील ५ लाख ५२ हजार ८५० एकूण ८५ टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ हजार ८२७ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील १२ ते १४ वयोगटातील एकुण २५ हजार १९३ मुलांपैकी १८ हजार ७८७ एकूण ७५ टक्के मुलांना कार्गोव्हॅक्स लसीचा पहिला डोस तर १४ हजार ७८७ एकूण ५९ टक्के मुलांना दूसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यत ७५ टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. १५ ते १८ वयोगटातील एकुण ३८ हजार ९७५ मुलांपैकी एकूण ७० टक्के २७ हजार ४१७ मुलांना पहिला डोस तर २२ हजार ६८४ एकूण ५८ टक्के मुलांना दुसरा डोस कोव्ह्यॅक्सिन लसीचा देण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ लाख ३६ हजार ७७० एकूण ९८ टक्के नागरिकांचे पहिल्या डोससाठीचे लसीकरण पूर्ण झाले असून दुसर्या डोससाठीचे लसीकरण ५ लाख ५२ हजार ८५० एकूण ८५ टक्के नागरिकांचे पूर्ण झाले आहे. १८ ते ४४ वयोगटातील पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे ७५ टक्के नागरिकांचे डोसचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दोन्ही डोस घेऊन ९ महिने पूर्ण झालेल्या नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येत असून आतापर्यंत जिल्ह्यातील १९ हजार ८२७ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आले आहेत. जिल्ह्यासाठी १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी कोर्बोवॅक्स लसीचे ३० हजार डोस उपलब्ध झाले असून सर्व प्रकारचे मुबलक प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध आहेत.

जिल्ह्यात सर्वात प्रथम ४५ वर्षावरील नागरिकांना कोविशिल्ड व कोवॅक्सिन लस देण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर १८ वर्षावरील ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. या सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण जवळपास पूर्ण होत आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular