26.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeSindhudurgशेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून दिलाशाची आशा

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून दिलाशाची आशा

वर्षभराच पिक हाती आले असतानांच अचानक परतीच्या पावसाने घातलेल्या गोंधळामुळे संपूर्ण पिकाची वाताहात झाली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.

कोकणात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेली पिके कुजून खराब झाल्याने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी स्थानिक सर्व पक्षाचे आमदार खासदार करताना दिसत आहेत. वर्षभराच पिक हाती आले असतानांच अचानक परतीच्या पावसाने घातलेल्या गोंधळामुळे संपूर्ण पिकाची वाताहात झाली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.

रत्नागिरी सह सिंधुदुर्गामध्ये देखील पावसाने शेतकर्यांचे तीन तेरा वाजवले आहेत. हाताशी आलेले पिक गेल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नेमळे गावातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानीबाबतचा अहवाल कंपनीला सादर केला. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असताना आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून तरी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

भात कापणीला आलेले असताना गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नेमळे गावात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐनभरात आलेली उभी भातशेती पावसामुळे शेतात आडवी झाली असून, ओलसर लोंब्याना कोंब फुटायला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी भात पाण्याखाली गेल्याने रोपे कुजलेल्या अवस्थेत आहे. या पार्श्वभूमीवर नेमळेतील काही शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विम्यामध्ये सहभागी होऊन पीकविमा भरला होता.

परतीच्या पावसामुळे गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार केली. त्यानुसार विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावात येत विमा भरलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भातपिकाची पाहणी करून नुकसानीचा अहवाल विमा कंपनीकडे पाठवून दिला. यावेळी नेमळे गावातील नुकसानग्रस्त विमाधारक शेतकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular