कोरोनामुळे सिंधुदुर्गामध्ये जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे आणि जलक्रीडा व्यवसाय ज्यामुळे मागील दोन वर्षापासून पुर्ण बंद ठेवल्याने उत्पन्न बंद होते ते व्यवसाय काही महिन्यांपूर्वी पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. आता कुठे कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी झाल्या कारणाने, व्यवसायांची स्थिती तग धरून उभी राहत आहे तर ओमीक्रोनच्या भीतीने सर्व व्यवसायांवर जिल्हा प्रशासनाने पुन्हा बंदी घातली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळे व जलक्रीडा व्यवसाय सरसकट बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे पर्यटन व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तरी पर्यटनस्थळे व जलक्रीडा व्यवसाय सरसकट बंद न ठेवता कोरोना निर्बंधासह चालू ठेवण्याबाबत आदेश व्हावेत, व्यावसायिकांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायिक महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यात बंद ठेवलेल्या पर्यटन व्यवसायाबाबत जिल्ह्यातील शेकडो पर्यटक व्यावसायिक एकत्र येऊन जिल्हाधिकार्यांकडे मागणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळे व जलक्रीडा व्यवसाय सरसकट बंद करण्याचा निर्णय घेतल्याने पर्यटन व्यावसायिकांवर पुन्हा बेरोजगारीची वेळ येणार आहे. तरी बंद केलेले व्यवसाय पुन्हा कोरोनाच्या निर्बंधासह सुरू करावेत व व्यावसायिकांना मदत करावी, अशी मागणी केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगाने वाढणाऱ्या ओमिक्रॉन व कोरोनाच्या संक्रमित रुग्ण संख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरसकट पर्यटनस्थळे व जलक्रीडा व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश स्थानिक प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत. कोरोना काळात पर्यटन व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक व चुकीचा असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे निर्बंधासह चालू करण्यात यावीत, अशी मागणी सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.