26 C
Ratnagiri
Thursday, July 24, 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवू : पंडित

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती...

सतरा जखमींसह नऊ मृत्यूंना महावितरण जबाबदार – सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

जिल्ह्यातील वीजग्राहकांना अखंडित विद्युतपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीमध्ये...

रत्नागिरी जिल्ह्यात तीन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’

जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा मारा सुरू...
HomeRatnagiriकोकण रेल्वेच्या सहा विशेष गाड्या, गणेशभक्तांसाठी सुविधा

कोकण रेल्वेच्या सहा विशेष गाड्या, गणेशभक्तांसाठी सुविधा

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी हा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेने सहा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. मुंबई सीएसएमटी सावंतवाडी रोड-मुंबई सीएसएमटी विशेष गाडी २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत दररोज रात्री १२.३० वाजता मुंबई सीएसएमटीहून सुटेल. ही रेल्वे त्याच दिवशी दुपारी २.२० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल तर सावंतवाडी रोड-मुंबई याच कालावधीत दुपारी ३.३५ वाजता सावंतवाडीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मुंबई सीएसटीएमला पहाटे ४.३५ वाजता पोहोचेल. लोकमान्य टिळक-सावंतवाडी रेल्वे २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी ८.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनल येथून सुटेल आणि रात्री ९ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. या कालावधीत दररोज रात्री १०.३५ वाजता सावंतवाडी येथून सुटणारी ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनन्स येथे पोहोचेल.

मुंबई-रत्नागिरी-मुंबई सीएसएमटी येथून २२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत दररोज रात्री ११.३० वाजता सुटेल आणि रात्री ८.१० वाजता रत्नागिरीला पोहोचेल तर रत्नागिरीहून दररोज पहाटे ४ वाजता सुटणारी ट्रेन दुपारी १.३० वाजता मुंबईला पोहोचेल. मुंबई-सावंतवाडी २२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत दररोज दुपारी ३.३० वाजता मुंबई एसएमटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. सावंतवाडी-मुंबई २३ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत दररोज पहाटे ४.३५ वाजता सावंतवाडीहून सुटेल आणि सायंकाळी ४.४० वाजता मुंबईला पोहोचेल. लोकमान्य टिळक (टी) सावंतवाडी २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत दररोज रात्री ९ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.२० वाजता सावंतवाडीला पोहोचेल. सावंतवाडीहून २३ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी ११.३५ वाजता सुटणारी ट्रेन मध्यरात्री १२.४० वाजता लोकमान्य टिळक (टर्मिनन्स) येथे पोहोचेल. दिवस जंक्शन-चिपळूण २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी ७.१५ वाजता निघून दुपारी २ वाजता चिपळूणला पोहोचेल. चिपळूणला याच कालावधीत दररोज दुपारी ३.३० वाजता सुटणारी ट्रेन त्याच दिवशी रात्री १०. ५० वाजता दिवा जंक्शनला पोहोचेल.

RELATED ARTICLES

Most Popular