26.8 C
Ratnagiri
Saturday, July 26, 2025

राज्यात म्हणे ८ मंत्र्यांना नारळ देणार! कोकणातील ४ पैकी कोण जाणार?

ज्या ८ मंत्र्यांवर टांगती तलवार आहे, त्यामध्ये...

राजापूरमध्ये एसटी बस, दुधाच्या टँकरमध्ये अपघात

ओणी पाचल मार्गावर पाचलकडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या आजिवली-रत्नागिरी...

हमीभाव दूरच आंबा-काजूला खात्रीचं मार्केटही नाही

बळीराजाच्या जीवनात संपन्नता न येण्याची अनेक कारणं...
HomeRatnagiriशेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे दिव्यांग बांधवांच्या घोषणांनी लांजा दणाणले

शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे दिव्यांग बांधवांच्या घोषणांनी लांजा दणाणले

लांजा तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

हमारा नेता कैसा हो, बच्चू कडू जैसा हो…. बच्चू कडू तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है… दिव्यांगांना ६ हजार पेन्शन मिळालीच पाहिजे…. कोण म्हणतो देणार नाय… घेतल्याशिवाय राहणार नाय…. भारत माता की जय…. वंदे मातरम…. जय जवान, जय किसान…. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे…. जय भवानी, जय शिवाजी…. अशा गगनभेदी घोषणा देत्त गुरुवारी दिव्यांग बांधवानी लांजा तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडला.

प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक – अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यातील शेतकरी कर्जमाफी व दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गुरुवारी २४ जुलै रोजी सकाळी लांजा येथे मुंबई – गोवा महामार्ग व तहसील कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या जिल्हा शाखेच्यावतीने आपल्या विविध मागण्यासाठी घोषणाबाजी करत आंदोलन छेडण्यात आले. यावेळी लांजा तहसील कार्यालयासमोर या दिव्यांग बांधवानी जोरदार घोषणाबाजी केली.

अनेकांचा सहभाग – गुरुवारी छेडण्यात आलेल्या या आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर, रत्नागिरी, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर व मंडणगड येथील संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह दिव्यांग, शेतकरी, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार सहभागी झाले होते. यावेळी लांजा तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. लांजाचे निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी व महसूल नायब तहसिलदार सुरेंद्र भोजे यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लांजा पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी लांजा तहसील कार्यालयाच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.

मोठा प्रतिसाद – या आंदोलनाचे नेतृत्व रत्नागिरी जिल्हा शाखेचे अध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी केले. या आंदोलनात संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष गौतम सावंत यांच्यासह पदाधिकारी संजय सुर्वे, अशोक भुस्कुटे, बंटी सुर्वे, राजापूर तालुकाध्यक्ष जैनुद्दीन बोबडे, गणेश चव्हाण यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी, महिला पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular