27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeRatnagiriपावसाळ्यानंतर भाट्ये खाडीतील गाळ उपसा

पावसाळ्यानंतर भाट्ये खाडीतील गाळ उपसा

भाट्ये खाडीच्या मुखाशी साचलेल्या गाळामुळे मच्छीमारांना संघर्ष करावा लागत आहे. याबाबत जमातुल मुस्लिमिन राजिवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छीमार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जनता दरबारात पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर समस्या मांडली. त्यांनीही भाट्ये खाडीतील गाळ काढण्यास पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये सुरू करणार असल्याचे सांगितले. भाट्ये खाडीच्या परिसरातील राजिवडा, कर्ला, भाट्ये, फणसोप, जुवे येथील मच्छीमारांना समुद्रात जाण्यासाठी मांडवी बंदराचे मुख हा एकमेव मार्ग आहे.

भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरासह संपूर्ण खाडी परिसर गाळाने भरला आहे. त्यामुळे मच्छीमारांना भविष्याची चिंता सतावत आहे. हा गाळ काढल्यास मच्छीमारांची मोठी समस्या दूर होणार आहे. त्याबाबत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा मच्छीमारांच्यावतीने शासनाला निवेदने देऊन गाळ उपशाची मागणी केली होती; परंतु हा गाळाचा प्रश्न शासनाने गांभीर्याने न घेतल्याने आज ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे भविष्यात मच्छीमारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी मच्छीमार संघर्ष समिती लढा देत आहे. जनता दरबारामध्ये नजीर वाडकर, दरबार वाडकर, शब्बीर भाटकर, जहूर बुड्ये, इमान सोलकर, फकीर मिरकर, रहीम दलाल उपस्थित होते.

ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात – पालकमंत्र्यांसमोर भाट्ये खाडीच्या मुखाशी साचलेल्या गाळाचा प्रश्न मांडला. त्या वेळी पालकमंत्र्यांनी भाट्ये खाडीतील गाळ उपशाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. पावसाळ्यानंतर पुढील मासेमारी हंगामात ऑक्टोबर महिन्यापासून गाळ उपशाला सुरुवात करण्यात येईल, आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

Most Popular