भारतीय पुरुष क्रिकेट प्रमाणेच महिलांच्याही क्रिकेट टीमचा कायमच बोलबाला असतो. त्यातील अनेक जणींचे अनेक चाहते आहेत. स्मृती मंधानानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या टेस्टमध्ये झळकावले आहे. या शतकानंतर तिनं अनेक विक्रमांची नोंद केली आहे.
डे-नाईट टेस्टमध्ये शतक झळकावणारी स्मृती ही दुसरी भारतीय बनली असून पहिली महिला क्रिकेटपटू असून, यापूर्वी २०१९ साली फक्त विराट कोहलीनं बांगलादेश विरुद्ध झालेल्या डे-नाईट टेस्टमध्ये शतक झळकावले आहे. या अभूतपूर्व खेळीनंतर स्मृती मंधानावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भारतीय क्रिकेटपटू हरलीन देओल हि देखील स्मृतीच्या खेळाचच नाही तर तिच्या दिसण्याचंही कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही. तिने ट्वीट करत एलेक्सा प्लीज प्ले, ओ हसीना जुल्फों वाली’ असं पोस्ट केल आहे. सोबतच स्मृती मंधानाचा शतकापूर्तीनंतरचा हेल्मेट काढून बॅट उंचावतानाचा फोटो देखील शेयर केला आहे.
अनेक खेळाडू सोशल मिडीयावर कायम सक्रीय असतात. हरलीनच्या या ट्वीटवर स्मृती मंधानाने सुद्धा मजेदारपणे उत्तर दिलं आहे. हरलीनच्या ट्वीटवर स्मृतीने ‘एलेक्सा प्लीज म्यूट हरलीन देओल आणि पुढे चिढवण्याची स्मायली देत’ उत्तर दिलं आहे.
स्मृती मंधाननं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यामध्ये २१६ बॉलमध्ये २२ फोर आणि १ सिक्सच्या मदतीनं १२७ रन्स केले. तिनं पूनम राऊतच्या मदतीनं दुसऱ्या विकेटसाठी १०२ रनची केलेली पार्टनरशिप हा ऑस्ट्रेलियामध्ये रेकॉर्ड आहे. तब्बल ३७ वर्षांनी स्मृतीनं शतक झळकवून विक्रम केला आहे. स्मृतीने काढलेले १२७ रन ही कोणत्याही महिला क्रिकेटपटूचा ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च स्कोअर आहे. त्यामुळे सर्व स्तरातून तिच्या खेळीच कौतुक होत आहे.