25.2 C
Ratnagiri
Saturday, January 25, 2025

जिल्ह्यात घुसलेल्या बांगलादेशींचा शोध घेऊन वितरण मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशी घुसखोर...

मालगुंड होणार आता पुस्तकांचे गाव मराठी भाषामंत्री उदय सामंत

रत्नागिरी तालुक्यातील पातील मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव...

वाशिष्ठीतील गाळ उपशासाठी यंत्रसामुग्री वाढवा आमदार निकम

वाशिष्ठो नदीतील गाळ उपसा कामासाठी पुरेसा निधी...
HomeRatnagiri..तरच भाजपने टोकाची भूमिका घ्यावी - आ. उदय सामंत

..तरच भाजपने टोकाची भूमिका घ्यावी – आ. उदय सामंत

मच्छीमारांसाठी जेटी, मिरकरवाडा बंदराच्या टप्पा दोनचे काम सुरू होणार आहे.

जनतेला मी एकही खोटे आश्वासन दिलेले नाही. जी कामे सांगितली ती सुरू आहेत. विकासकामांचा शब्द दिला आहे तो मी पूर्ण करणार आहे. शहर आणि जिल्ह्यात अनेक विकासकामे सुरू आहेत. लवकरच ती पूर्ण होतील. मित्रपक्ष भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात घ्या, आपण सरकारमध्ये एकत्र आहोत. एखादे काम माझ्याकडे किंवा किरण सामंत यांच्याकडे घेऊन आलात आणि ते झाले नाही, तर टोकाची भूमिका घ्या, असे मत शिवसेना नेते उदय सामंत यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजापूरचे आमदार किरण सामंत उपस्थित होते. आमदार सामंत म्हणाले, ‘माझ्या शिवसैनिकांसह भाजप, राष्ट्रवादी आणि हितचिंतकांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. महायुतीने प्रामाणिक काम केले म्हणून आम्ही निवडून आलो. सर्वत्र महायुतीमधील घटक पक्ष भाजपने सहकार्य केले. जनतेने स्वीकारले म्हणून आम्ही निवडून आलो. रत्नागिरीत थ्रीडी मल्टिमीडिया शो, शिवसृष्टी, बसस्थानक, काँक्रिटीकरण सुरू आहे. मच्छीमारांसाठी जेटी, मिरकरवाडा बंदराच्या टप्पा दोनचे काम सुरू होणार आहे.

क्रीडासंकुलाचे कामही वेगाने सुरू आहे. प्रगतिपथावर असलेली ही कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. शहरातील घनकचरा प्रकल्पासाठी एमआयडीसीत ५ एकर जागा दिली आहे, तरीही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घनकचऱ्याबाबत पालिकेला निवेदन दिले. एखादे काम माझ्याकडे, भैयांकडे सांगूनही झाले नाही, तर टोकाची भूमिका घ्यावी.”उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील कलहाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘ठाकरे सेनेतील कलहाची चर्चा मुंबईपर्यंत पोहोचली आहे; परंतु कोणी कोणाला मतदान केले हे देवाजवळ जाऊन खरं-खोट करणे योग्य नाही. ज्यांना योग्य वाटले त्यांनी मला मतदान केले. ज्यांना योग्य वाटले नाही त्यांनी समोरच्याला मतदान केले; परंतु निवडणुकीत कुणी कुणाला मतदान केले यासाठी गाऱ्हाणे घालणे अयोग्य आहे.’

चाळकेंनी वैयक्तिक निर्णय घ्यावा : सामंत – जिल्हाप्रमुख विलास चाळकेंविषयी सामंत म्हणाले, ‘चाळके हे कडवट शिवसैनिक आहेत. त्यांचे आणि आमचे चांगले संबंध आहेत; परंतु त्यांनी कडवटपणाने निवडणूक लढली, तरीही त्यांना असा त्रास होत असला, तर त्यांनी वैयक्तिक चांगला निर्णय घ्यावा, असा सल्ला सामंत यांनी दिला.

RELATED ARTICLES

Most Popular