31.3 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeRatnagiriजिल्ह्यात सोशल मीडिया लॅब, पोलिस महानिरीक्षक दराडे

जिल्ह्यात सोशल मीडिया लॅब, पोलिस महानिरीक्षक दराडे

आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ, फोटो टाकणाऱ्यांवर २४ तास वॉच ठेवण्यात येईल.

सोशल मीडियाचा गैरवापर वाढत आहे. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. हे टाळण्यासाठी जिल्ह्यात सोशल मीडिया लॅब तयार करण्यात येत आहे. या लॅबमधून काही आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ, फोटो टाकणाऱ्यांवर २४ तास वॉच (लक्ष) ठेवण्यात येईल. यामुळे गैरप्रकारांना प्रतिबंध घालणे शक्य होणार आहे, अशी माहिती कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी दिली. वार्षिक तपासणीनिमित्त रत्नागिरी दौऱ्यावर आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड आदी उपस्थित होते. श्री. दराडे म्हणाले, “पोलिस दलाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. १०० दिवसांचा सात कलमी कार्यक्रम आहे. त्याची अंमलबजावणी होते की नाही, याचाही आढावा घेतला. चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. अजून काही पोलिस ठाण्यांचा आढावा घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यासह राज्यात पोलिस दलाने अमली पदार्थविरोधी लढा सुरू केला आहे. अमली पदार्थाची समुद्र मार्गे तस्करी होत असेल तर त्याबाबत पोलिस, कस्टम, तटरक्षक दल आदी संयुक्त गस्त घालून त्यावर लक्ष ठेवून आहे. जमीनवर कुठे तस्करी सुरू असेल तर त्याला प्रतिबंध घालण्यासाठी ठिकठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी सुरू आहे. अमलीपदार्थ हद्दपार करण्याच्यादृष्टीने पोलिस प्रयत्न करत आहे. सागरी सुरक्षेवरही आमचे बारीक लक्ष आहे. गस्तीसाठी पोलिस दलाकडे सात स्पीड बोटी आहेत. त्यांच्या माध्यमातून सागरी गस्त सुरू असते.”सायबर गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुन्हेगार दरवेळी गुन्ह्याची वेगळी आणि अत्याधुनिक पद्धत वापरत आहे. परंतु त्यापद्धतीने पोलिस दल देखील अधिक स्मार्ट होत आहे. पोलिस अधिकाऱ्यांना त्यासाठी वारंवार हैदराबाद, कोलकाता आदी ठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. पोलिसदल देखील अधिक सक्षम होत आहे, असे दराडे म्हणाले.

बांगलादेशीयांवर बारीक लक्ष – बांगलादेशीयांबाबत जिल्ह्यात वारंवार सर्च ऑपरेशन केले जात आहे. यापूर्वी देखील १३ बांगलादेशीयांवर आपण कारवाई केली आहे. त्यांना बांगलादेशात परत पाठविण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात बांगलादेशीयांवर पोलिसदलाचे बारीक लक्ष आहे, असेही श्री. दराडे म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular