29.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

चिपळुणात एक ‘सीएनजी’ एसटीसाठी आरक्षित – आगाराचा प्रस्ताव

शहरातील शिवाजीनगर बसस्थानक परिसरातील सीएनजी पंपावर सीएनजी...

शैक्षणिकदृष्ट्या रत्नागिरी जिल्हा अग्रेसर बनत असल्याचा अभिमान वाटतोः ना. सामंत

शैक्षणिक क्षेत्रात विविधं प्रयोग होत आहेत. त्यामुळे...

खेडच्या जगबुडी पुलाजवळ भीषण अपघात; ११ वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर खेड जवळ पुलाजवळ...
HomeLifestyleसोशल मीडियाच्या अति वापरामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले

सोशल मीडियाच्या अति वापरामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले

गेल्या वर्षभरात प्राप्त झालेल्या एकूण तक्रारींपैकी जवळपास ३५ टक्के तक्रारींमध्ये मोबाईलचा अतिवापरामुळे पत्नी अथवा कुटुंबियांकडे दुर्लक्ष या स्वरूपाची कारणे आहेत

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. सध्या लग्न या संकल्पनेला कोणतीच वैधता राहिलेली नाही आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. घटस्फोट हा शब्द ऐकला तरी अनेकांच्या काळजामध्ये धस्स होते, परंतु सध्याच्या काळामध्ये हे प्रकरण मोठ्या प्रमाणात उदयास आले आहे.

घटस्फोटाची कारणे सुद्धा विविध प्रकारची दिली जात आहेत. सोशल मीडियाच्या आहारी गेल्यामुळे पती-पत्नीच्या नात्यांत दुरावा निर्माण झाल्याच्या अनेक घटना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणासमोर आल्या आहेत. विधी सेवा प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात राज्यात २५ हजाराहून अधिक घटस्फोटासाठी अर्ज करण्यात आले आहेत. त्यापैकी ३५ टक्के प्रकरणांत घटस्फोटासाठी मोबाईल अथवा सोशल मीडियाचे कारण पुढे करण्यात आले आहे.

एकट्या मुंबईमध्ये २०२१ या वर्षात ७ हजार तर पुण्यात १२ हजार अर्ज घटस्फोटासाठी दाखल करण्यात आले आहेत. विधी सेवा प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात राज्यात घटस्फोटाची सुमारे २५ हजार प्रकरणे समोर आली असून,  त्यापैकी ३५ टक्के प्रकरणांत घटस्फोटासाठी सोशल मीडियाचे कारण पुढे करण्यात आले आहे. घटस्फोट घेऊन मोकळे व्हावे, या मतापर्यंत पोहोचलेल्या दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांची पुन्हा मने जुळवण्याचे काम या प्राधिकरणा मार्फत केले जाते.

गेल्या वर्षभरात या प्राधिकरणाकडे आलेल्या एकूण संख्येच्या अर्जापैकी ३५ टक्के दाम्पत्यांचे यशस्वी समुपदेशन झाल्याने ते सुखाने नांदत आहेत. तर ५० टक्के जोडप्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे यालाच म्युच्युअल डिव्होर्स घेणे असे म्हटले जाते.

मुंबई आणि पुण्याच्या पाठोपाठ नागपूरचा तिसरा क्रमांक आहे. लग्नात मानपान किंवा हुंडा दिला नाही, खोटे सांगून फसवणूक, मानसिक छळ, पती कामधंदा काहीच करत नाही, पत्नीला स्वयंपाक येत नाही, सासु-सासरे छळ करतात  अशा स्वरूपाची कारणे यापूर्वी पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत होती. मात्र, आता त्यांची जागा सोशल मीडियाशी संबंधित कारणेही वाढू लागली आहेत. गेल्या वर्षभरात प्राप्त झालेल्या एकूण तक्रारींपैकी जवळपास ३५ टक्के तक्रारींमध्ये मोबाईलचा अतिवापरामुळे पत्नी अथवा कुटुंबियांकडे दुर्लक्ष या स्वरूपाची कारणे आहेत, असे विधी सेवा प्राधिकरणाच्या ठाण्यातील सूत्रांनी सांगितले.

घटस्फोट हा पर्याय अयोग्य नव्हे, आयुष्यभर कुढत जगण्यापेक्षा वेगळ होऊन आपले जीवन स्वत:च्या हिमतीवर जगलेले केंव्हाही चांगले, मग ती स्त्री असो वा पुरुष. पण शुल्लक कारणावरून नात्यात आलेला दुरावा वेळीच सावरलेला बरा, कारण नंतर नात्यातील वाढलेला पसारा घटस्फोटापर्यंत नेऊनच संपतो.

RELATED ARTICLES

Most Popular