26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeChiplunसोसायट्यांना मिळणार मोठा दिलासा, शिल्लक गाळ्यांच्या स्टॅम्पड्युटीत सवलत

सोसायट्यांना मिळणार मोठा दिलासा, शिल्लक गाळ्यांच्या स्टॅम्पड्युटीत सवलत

गृहनिर्माण संस्थांच्या नावे अभिहस्तांतरण करताना इमारतीतील न विकल्या गेलेल्या गाळ्यांची स्टॅम्प ड्युटी भरणे सोसायट्यांना आवश्यक नाही, असे निर्देश पुणे नोंदणी महानिरीक्षकांनी दिले आहेत. त्यामुळे सोसायट्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत रत्नागिरी जिल्हा हाऊसिंग सोसायटीज् वेल्फेअर असोसिएशन संस्थापक अध्यक्ष एस. बी. कदम यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. महाराष्ट्र शासनाने रजिस्टर्ड गृहनिर्माण संस्थांच्या नावे मालमत्ता हस्तांतरित करून देण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. हे हस्तांतरण लेख दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये रजिस्टर्ड करून केले जाते. या प्रक्रियेमध्ये इमारतीतील न विकल्या गेलेल्या गाळ्यांचा कायमच मोठा अडथळा येत होता. कारण, हस्तांतरण लेख रजिस्टर्ड करताना न विकल्या गेलेल्या सदनिका, दुकान गाळे यांची अपेक्षित स्टॅम्प ड्युटी भरण्यास संबंधित गृहनिर्माण संस्थेस सांगितले जात होते.

त्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांनी नाइलाजास्तव व मालमसा हस्तांतरित करून घेण्याच्या दृष्टीने न विकल्या गेलेल्या गाळ्यांची स्टॅम्प ड्युटी भरत होते; मात्र ज्या गृहनिर्माण संस्थांना ही स्टॅम्प ड्युटी भरणे शक्य नाही, अशा अनेक संस्थांची अभिहस्तांतरणी प्रकरणे दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये सादर न होता प्रलंबित राहिली आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा हाऊसिंग सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे संस्थाप अध्यक्ष एस. बी. कदम यांनी या समस्येबाबत पुणे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे सहकार आयुक्त व निबंधक यांच्यासह संबंधितांकडे पत्रव्यवहार करून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणला होता.

RELATED ARTICLES

Most Popular