26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeChiplunचिपळुणातील प्रकार खड्डे बुजविण्यासाठी मातीमिश्रित गाळ

चिपळुणातील प्रकार खड्डे बुजविण्यासाठी मातीमिश्रित गाळ

रस्त्यांवर मतिमिश्रित गोल दगडांच्या गाळाचे अनेक ठिकाणी ढीग मारलेले आहेत.

शहरातील अनेक रस्ते उखडले आहेत. त्याच्या डागडुजीचे काम नगरपालिकेने हाती घेतले आहे, पण हे खड्डे खडीने न भरता नदीपात्रातील मातीमिश्रित गाळाने भरले जात आहेत. त्यावर बारीक खडी टाकून डांबरने बुजविले जात आहेत. खडीऐवजी मातीमिश्रित गाळ खड्डे बुजविण्यासाठी वापरणे हे कोणत्या शास्त्रात बसते हे नगरपालिकेने एकदा सांगावे, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संजीव अणेराव यानी केला आहे. चिपळूण महापूर-वाशिष्ठी नदीतील गाळाचे लाभार्थी आणि चिपळूण शहरातील खड्डयांचे वास्तव यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अणेराव म्हणाले, चिपळूण शहरात आलेल्या महापुरामुळे हजारो नागरिकांचे नुकसान झाले.

मात्र गाळ उपसा झाल्यानंतर या गाळाचे अनेक जण लाभार्थी झाले. या लाभार्थीपैकी एक चिपळूण पालिकाही आहे. शहरातील स्वामी मठ ते रामेश्वर मंदिर रस्ता, क्वालिटी बेकरी ते रामेश्वर मंदिर रस्ता, प्रभात रोड आणि मुरादपूर रोड ही याची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. या रस्त्यांवर मतिमिश्रित गोल दगडांच्या गाळाचे अनेक ठिकाणी ढीग मारलेले आहेत. यातील स्वामी मठ ते रामेश्वर मंदिर या रस्त्याला गेल्या पावसाळ्यापासून प्रचंड खड्डे पडले आहेत.

अखंड उन्हाळा गेला पण नगरपालिकेने या रस्त्यावरील खड्डे भरले नाहीत आणि आता नदीतील गाळ टाकून खड्डे भरले जात आहेत. मोठा पाऊस पडला की ही माती वरती येणार हे कोणीही सांगू शकेल. सीईओ शिंगटे यानी यामध्ये हस्तक्षेप करावा आणि हा जनतेच्या पैशांचा अपव्यय तातडीने थांबवावा आणि टाकलेला गाळ काढून पूर्ण खडी आणि डांबराने हे खड्डे भरावेत, अशी मागणीही त्यानी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular