कोरोना काळामध्ये गरीब आणि मजुरांना आर्थिक मदत करून तारणहार म्हणून जाग्भारात्म्ध्ये प्रसिदधी मिळालेला अभिनेता सोनू सूद सध्या कर चुकविण्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोनू सूदवर आयकर विभागाने २० कोटींचा कर चोरीचा तसेच चॅरिटी ट्रस्ट द्वारे विदेशी निधी अधिनियम अॅक्ट नियमावलीचे उल्लंघन केल्याचाही ठपका ठेवला आहे. आयकर विभाग गेल्या तीन दिवसांपासून कर चोरी प्रकरणी विविध ठीकाणी छापे मारत कारवाई करत आहे. आयकर विभागाने मुंबई, जयपूर, दिल्ली लखनऊ, कानपूर आणि गुरुग्रामसह २८ ठिकाणी छापा मारला आहे. त्यामुळे अभिनेता सोनू सूद याच्या अडचणीमध्ये अजूनच वाढ झाल्याची दिसून येत आहे.
आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोनू सूदनं आपला चॅरिटी ट्रस्ट २ जुलै २०२० रोजी बनवलेला. या ट्रस्टमध्ये १८ कोटी ९४ लाख रुपये आले. यापैकी १ कोटी ९० लाख विविध धार्मिक कार्यासाठी खर्च केले आहेत. तर उर्वरित १७ कोटी रुपये अजूनही ट्रस्टच्या खात्यामध्येच जमा आहेत.
आयकर विभागाने स्पष्ट केले आहे कि, सोनू सूदने लखनौमधील एका इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या विविध भागातील रिअल इस्टेटच्या प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली दिसून येत आहे. याठिकाणी आतापर्यंत अशा ६५ कोटींचे बोगस पुरावे सापडले असून १.८ कोटी रुपयांची रोकड देखील जप्त करण्यात आली आहे. तसेच सोनूने परदेशी देणगीदारांकडून क्राउडफंडिंग मार्फत २.१ कोटी रुपये गोळा केल्याने परदेशी नियमन कायद्याचे उल्लंघन झाले आहे. या व्यवहारांमुळे मनी लाँड्रिंग कायद्याचे उल्लंघन होत असल्याने, याप्रकरणी ईडीमार्फत चौकशी सुरु होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.