28.2 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeEntertainment१ कोटी रुपयांची चाहत्याची मागणी – सोनू सूद

१ कोटी रुपयांची चाहत्याची मागणी – सोनू सूद

अभिनेता सोनू सूद सध्या कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असताना दिसतो. कोरोना काळामध्ये पहिल्या आणि दुसर्या लाटेच्या दरम्यान अनेक लोकांन त्याने अनेक तर्हेने मदत केलेली.  सोशल मीडियावर देखील सोनू कायम अॅक्टिव असल्याने अनेक जण सहज त्याच्याकडे कोणत्याही गोष्टीसाठी मदत मागायला मागे पुढे बघत नाहीत. सोनू सूदकडे त्याचे अनेक चाहते ट्विट करुन एकदम हटकेच मागण्या करत असतात,  पण या अशा त्यांच्या या मागण्यांनाही तो नेहमी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. सोनूकडे पुन्हा एकदा असेच एक अशीच ट्विट करून मागणी करण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे.

सोनू सूदच्या कायम मदत करण्याच्या वृत्तीमुळे एका चाहत्याने ट्विट करत अशी मागणी केली होती, सर मला एक कोटी हवे आहेत.  चाहत्याच्या या वजनदार मागणीवर सोनू सूदने देखील मिस्कीलपणे प्रतिसाद दिला आहे. ‘फक्त एक कोटी?  अजून थोडे मागितले असते’,  असं सोनू सूदने रिट्वीट करून म्हटलं आहे. यामध्ये त्याने एक स्माईल इमोजी देखील ट्विटमध्ये पोस्ट केली आहे.

दुसऱ्या एका यूजरने लिहलं आहे कि,  सोनू सूद सर मला तुमच्या सोबत काम करण्याची इच्छा आहे, तुम्ही मला पुढील सिनेमात एखादा रोल देणार का?  तर या यूजरला सोनूने रिअल लाईफ हिरो बनण्याचा सल्ला दिला आहे. गरजेच्या वेळेला एखाद्याची खरी मदत करणे हाच सर्वात मोठा रोल आहे. हा रोल तू योग्य प्रकारे पार केल्यावर, इतर कोणीही तुझ्यापेक्षा मोठा हिरो होऊच शकत नाही. गेल्या वर्षी लोकांना मदत करणारा सोनू सूद निर्माण झाल्यापासून अनेक गोष्टी त्याच्याबद्दल बोलल्या जात असून, सोनू सुद्धा त्यावर आवर्जुन प्रतिसाद देत असतो.

RELATED ARTICLES

Most Popular