28.5 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeRatnagiriऐन दिवाळीमध्ये रूग्णालय प्रशासनाची “त्या” ७३ कर्मचार्‍यांना अनोखी भेट

ऐन दिवाळीमध्ये रूग्णालय प्रशासनाची “त्या” ७३ कर्मचार्‍यांना अनोखी भेट

रत्नागिरी जिल्हयामध्ये कोरोनाचा कहर जेंव्हा मोठ्या प्रमाणात वाढला होता तेंव्हा, वैद्यकीय कर्मचारी भारती करण्यात आली होती. त्यामध्ये डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचार्यांवर कामाचा ताण पडू नये यासाठी त्यांचा भार हलका करण्यासाठी, तसेच मदतीसाठी ७३ कर्मचार्यांना कंत्राटी स्वरुपात कामावर घेण्यात आले.

कोरोना काळात कोविड योद्धा म्हणून काम करणार्‍या जिल्हा शासकीय रूग्णालय आणि महिला रूग्णालयातील ७३ कंत्राटी कर्मचार्‍यांची दिवाळी अखेर अंधारातच गेली. तीन महिन्यांचा पगार नाहीच. शिवाय ५० टक्के कर्मचारी कमी करण्याबाबत रूग्णालय प्रशासनाने तोंडी आदेश बजावल्याने कर्मचारी संतापले आहेत.

उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत या कर्मचार्‍यांना सेवामुक्त करण्यात येवू नये, असे आदेश असतानाही नोटीस काढली आहे. या महिन्यात हजेरी देखील भरून घेतलेली नाही. आम्ही ५० टक्के कर्मचारी कपातीचे धोरण चालू देणार नाही. एकतर सर्वांना ठेवा किंवा काढा.

नाम. उदय सामंत यांनी सुद्धा मधी हस्तक्षेप करून त्या कर्मचार्यांना कामावरून काढणार नाही, परत रुजू करून घेऊ  असा शब्द दिला होता. कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली असल्याने, त्या ७३ कर्मचार्यांना वेतन रोखण्याचे, तोंडी कामावर रुजू होऊ न देण्याचे सुद्धा आदेश देण्यात आल्याच्या घटना मध्यंतरीच्या घडल्या होत्या.

यावेळी कर्मचारीही “आम्ही आरोग्यमंत्र्यांच्या आदेशापर्यंत काम करत राहणार” , अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. ऐन दिवाळीमध्ये रूग्णालय प्रशासनाने या ७३ कर्मचार्‍यांना अनोखी भेट दिली आहे. पगारा विना खचलेल्या ७३ कर्मचार्‍यांचे अजूनच खच्चीकरण सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular