26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtraदुबईतून येणाऱ्या प्रवाशांवर पालिका प्रशासनाचे विशेष लक्ष, सक्तीचे ७ दिवस गृह विलगीकरण

दुबईतून येणाऱ्या प्रवाशांवर पालिका प्रशासनाचे विशेष लक्ष, सक्तीचे ७ दिवस गृह विलगीकरण

राज्यात वाढणारी ओमायक्रॉन विषाणूच्या रुग्णांची संख्या चिंतेत टाकणारी आहे. त्यामुळे सरकार या विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी कडक निर्बंध लादण्याच्या प्रयत्नात आहे. कारण मागील दोन वर्षामध्ये उद्भवलेली परिस्थिती इतकी भयावह होती कि, त्यामध्ये अनेकानी बऱ्याच गोष्टी गमावल्या. त्यामुळे कोरोनाच्या दुसर्या लाटेवर मात करण्यात यशस्वी होत असतानांच या नव्या विषाणूच्या संकटाने शासनाचे धाबे पुन्हा दणाणले आहेत.

त्यामुळे पालिका प्रशासनाने मुख्य करून विमानाने येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दुबईहून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे. ओमायक्रॉनच्या रुग्ण जास्त असलेल्या जोखमीच्या देशातून येणारे प्रवासी दुबईमार्गे आपला प्रवास करत असल्याचे निदर्शनास आल्याने, दुबई विमानतळावर जगभरातील प्रवाशांचा संपर्क येत असतो. त्यामुळे दुबईहून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीचे सात दिवस गृह विलगीकरण करण्यास ठेवण्यात येणार आहे.

ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी याबाबतची नवीन नियमावली जाहीर केली आहे. भारत सरकारने १२ देशांची यादी तयार केली आहे. त्या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर आधीच निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र असे आढळून आले आहे की या १२ देशातील प्रवासी अनेकदा आपल्या पुढील प्रवासासाठी दुबईमार्गे जातात. आणि दुबई विमानतळावर अनेक देशातील प्रवासी उतरतात व ते एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे यापुढे दुबईतून येणाऱ्या प्रवाशांवरही पालिका प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे.

दुबईहून मुंबई विमानतळावर उतरून मग विमानाने अन्य राज्यात जाणाऱ्या प्रवाशांवर कोणतीही निर्बंध नसले तरी त्यांच्याशी विमानतळ प्राधिकरणाने समन्वय राखावा,  असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिका नव्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नवनवीन उपाययोजना आखत असून, नागरिकांना सुद्धा वेळोवेळी सतर्क करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular